Home / News / आसिफ अली झरदारींची प्रकृती बिघडली

आसिफ अली झरदारींची प्रकृती बिघडली

पेशावर – पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांची प्रकृती बिघडली. ताप आणि संसर्ग केल्यानंतर त्यांना कराचीपासून ६०० किमी अंतरावर असलेल्या...

By: E-Paper Navakal

पेशावर – पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांची प्रकृती बिघडली. ताप आणि संसर्ग केल्यानंतर त्यांना कराचीपासून ६०० किमी अंतरावर असलेल्या नवाबशाह येथून रुग्णालयात आणण्यात आले.त्याच्यावर अनेक चाचण्या करण्यात आल्या आणि डॉक्टर त्याच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत.

२३ मार्च रोजी पाकिस्तान दिनी झरदारी यांनी भाषण दिले तेव्हा त्यांची जीभ अनेक वेळा अडखळली.त्यांच्या भाषणात असे दिसून आले की,झरदारींना प्रत्येक शब्द वाचणे कठीण जात होते.लांब वाक्य वाचताना त्यांना अनेकदा श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे दिसून आले.यानंतर लोक त्याच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त करत होते.

Web Title:
संबंधित बातम्या