Home / महाराष्ट्र / Rohit Pawar : जिल्हाधिकाऱ्यांचं पत्र अन् पोलिसांच्या नोटिसींनंतरही रोहित पवार आंदोलनावर ठाम; पंढरपूरच्या ऐतिहासिक चौकात आमदार रोहित पवारांचे ‘अन्नत्याग’ उपोषण…

Rohit Pawar : जिल्हाधिकाऱ्यांचं पत्र अन् पोलिसांच्या नोटिसींनंतरही रोहित पवार आंदोलनावर ठाम; पंढरपूरच्या ऐतिहासिक चौकात आमदार रोहित पवारांचे ‘अन्नत्याग’ उपोषण…

Rohit Pawar : महाराष्ट्रातील बळीराजाच्या विविध न्याय्य मागण्यांसाठी आणि जाचक अटींविना सरसकट कर्जमाफी मिळावी या प्रमुख मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र...

By: Team Navakal
Rohit Pawar :
Social + WhatsApp CTA

Rohit Pawar : महाराष्ट्रातील बळीराजाच्या विविध न्याय्य मागण्यांसाठी आणि जाचक अटींविना सरसकट कर्जमाफी मिळावी या प्रमुख मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी पंढरपूर या पवित्र तीर्थक्षेत्री ‘अन्नदात्यासाठी अन्नत्याग’ हे बेमुदत लाक्षणिक उपोषण सुरू केले आहे. जोपर्यंत राज्य सरकार शेतकऱ्यांच्या हिताचा ठोस निर्णय घेत नाही आणि सरसकट कर्जमाफी जाहीर करत नाही, तोपर्यंत आपले हे आंदोलन अविरतपणे सुरूच राहील, असा स्पष्ट आणि आक्रमक इशारा आमदार रोहित पवार यांनी प्रशासनाला दिला आहे. शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर थेट रस्त्यावर उतरून पवारांनी पुकारलेल्या या आंदोलनामुळे पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे.

प्रशासकीय नोटीस आणि जिल्हाधिकाऱ्यांचे पत्र डावलून आंदोलन सुरू-
आमदार रोहित पवार यांनी पंढरपूर येथील गजबजलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात शुक्रवारपासून या आंदोलनाचा एल्गार केला आहे. सध्या राज्यात विधान परिषदेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्यामुळे, कायदा व सुव्यवस्थेचे कारण पुढे करत सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आमदार पवारांना या संवेदनशील काळात आंदोलनाचा पुनर्विचार करावा, असे अधिकृत पत्र पाठवले होते.

तसेच शुक्रवारी सकाळी पोलीस प्रशासनानेही छत्रपती शिवाजी महाराज चौकातील वाहतूक कोंडी आणि सुरक्षेचा दाखला देत आंदोलन न करण्याची नोटीस बजावली होती. मात्र, प्रशासकीय दडपण आणि पोलिसांच्या नोटिसीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत रोहित पवार हे आपल्या नियोजित स्थळीच आंदोलनावर ठाम राहिले आणि त्यांनी उपोषणाला सुरुवात केली.

विठ्ठल चरणी साकडे आणि संविधानाचा हातात घेऊन आगमन
या आंदोलनाची रीतसर सुरुवात करण्यापूर्वी आमदार रोहित पवार यांनी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या महाद्वारात असलेल्या संत नामदेव पायरीचे अत्यंत श्रद्धेने दर्शन घेतले. त्या ठिकाणी विठ्ठलाची आरती करून, “सध्याच्या फडणवीस सरकारला राज्यातील गरीब शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्याची सुबुद्धी दे,” असे भावूक साकडे त्यांनी विठ्ठल चरणी घातले.

त्यानंतर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्यानंतर, हातामध्ये भारतीय संविधानाची प्रत घेऊन ते आंदोलनाच्या मुख्य मंडपात दाखल झाले. या वेळी त्यांच्या सोबतीला राष्ट्रवादी काँग्रेसचे (श.प.) आमदार राजू खरे, नुकतेच भाजपच्या बैठकीला हजर राहून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देणारे राष्ट्रवादीचे आमदार अभिजित पाटील यांच्यासह अनेक वरिष्ठ पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

“रोहित पवारांचे आंदोलन म्हणजे केवळ स्टंटबाजी”; भाजप किसान मोर्चाचा घणाघात
दुसरीकडे, आमदार रोहित पवारांच्या या आंदोलनावर सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने अत्यंत तीव्र शब्दांत आक्षेप घेतला आहे. भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सचिव माउली हळणवर यांनी या आंदोलनाचा खरपूस समाचार घेताना याला निव्वळ ‘राजकीय स्टंटबाजी’ असे संबोधले. हळणवर यांनी म्हटले की, “गेल्या आठ महिन्यांपूर्वीच सरकारने सर्व बँकांकडून कर्जदार शेतकऱ्यांच्या याद्या मागवून कर्जमाफीचे निकष जाहीर केले होते. या संदर्भातील संपूर्ण माहिती विधानसभेत चर्चेदरम्यान समोर आली होती. जर रोहित पवारांना या निकषांवर खरोखरच आक्षेप होता, तर त्यांनी त्याच वेळी सभागृहात आवाज उठवायला हवा होता.”

“त्या वेळी तिथे मवाळ आणि बोटचेपे धोरण स्वीकारणारे रोहित पवार आज पंढरपुरात येऊन राजकीय ढोंग करत आहेत. सध्या अधिक महिन्या निमित्त पंढरपुरात विठ्ठल दर्शनासाठी लाखो भाविकांची अलोट गर्दी आहे. या निष्पाप वारकऱ्यांना आणि भाविकांना वेठीस धरून, केवळ प्रशासनावर नाहक ताण निर्माण करण्यासाठीच हा राजकीय स्टंट सुरू आहे,” अशी बोचरी टीका त्यांनी केली.

“आता कोणत्याही आश्वासनावर उपोषण मागे घेऊ नये”
भाजप नेते माउली हळणवर यांनी पुढे बोलताना आमदार पवारांना एक खोचक आव्हानही दिले. ते म्हणाले की, “जर आमदार रोहित पवार यांना अन्नदात्या शेतकऱ्यांविषयी खरोखरच इतका कळवळा आणि आत्मीयता असेल, तर त्यांनी हे आंदोलन पंढरपूरच्या शहरात न करता थेट शेतकऱ्यांच्या बांधावर किंवा शेतशिवारात करायला हवे होते, जेणेकरून खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फुटली असती.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या