गुजरातमध्ये पावसाचा कहर ! कर्नाटकच्या मंगरुळुत पूरस्थिती

gujrat heavy rainfall

गांधीनगर – देशातील विविध राज्यांमध्ये पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. २१ जूनपर्यंत विविध राज्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर गुजरातमधील (gujrat)अनेक भागांमध्ये कालपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे पुराचा धोका निर्माण झाला आहे. कर्नाटकात दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. मंगरुळुत पूरस्थिती निर्माण झाली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.

गुजरातमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक भाग जलमय झाले आहेत. भावनगरमध्ये पुराच्या पाण्यामुळे रहिवाशांची वाढवली आहे. जिल्हा प्रशासनाच्या पथकाने पुरात अडकलेल्या ४० नागरिकांची सुखरूप सुटका केली आहे. बोटाड जिल्ह्यातील गढडा येथील शहरी व ग्रामीण भागांत पावसाचे पाणी साचले आहे. सौराष्ट्रातील पोरबंदर, जुनागड, द्वारका, गिर सोमनाथ आणि दीव या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याने या भागांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पुढील सात दिवसांत गुजरातमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून, त्यातील तीन दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होईल.

कर्नाटकातही दोन दिवसांपासून मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत केले आहे. उडुपी, उत्तर कर्नाटक, दक्षिण कर्नाटक या भागांत जोरदार पाऊस सुरू आहे. कन्नड, उडुपी, चिकमंगलूर, कोडगु आणि शिवमोगा जिल्ह्यांत पावसामुळे घरांचे नुकसान झाले असून, वीजपुरवठा व वाहतूक व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली आहे.मंगरुळु येथे पूरस्थिती निर्माण झाली आहे. उत्तर कन्नड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत पाच ठिकाणी भूस्खलन (road damage) झाले आहे.केरळच्या कोट्टायम जिल्ह्यातही मुसळधार पावसाने जोर धरला असून, मीनाचिल नदी दुथडी भरून वाहत आहे.