SBI क्रेडिट कार्डचे नियम बदलले, आता विमान अपघात विम्याचा लाभ मिळणार नाही

SBI Credit Card Changes

SBI Credit Card Changes | एसबीआय कार्डने (SBI Card) आपल्या क्रेडिट कार्डधारकांसाठी (ISBI Credit Card) महत्त्वाच्या बदलांची घोषणा केली आहे. एसबीआय क्रेडिट कार्डसाठी 15 जुलै 2025 पासून नवीन नियम लागू होतील. यामध्ये मिनिमम ड्यु पेमेंट कॅल्क्युलेशन, पेमेंट सेटलमेंट ऑर्डर आणि निवडक क्रेडिट कार्ड्सवरील कॉम्प्लिमेंटरी एअर ॲक्सिडेंट इन्शुरन्स (Air Accident Insurance) बंद करण्याचा समावेश आहे.

15 जुलै 2025 पासून एसबीआय कार्ड काही प्रीमियम कार्ड्सवरील 1 कोटी रुपयांचा कॉम्प्लिमेंटरी एअर ॲक्सिडेंट इन्शुरन्स बंद करेल. यामध्ये एसबीआय कार्ड एलिट, माइल्स एलिट आणि माइल्स प्राइम यांचा समावेश आहे. तसेच, एसबीआय कार्ड प्राइम आणि पल्स कार्ड्सवरील 50 लाखांचा इन्शुरन्सही याच तारखेपासून बंद होईल.

11 ऑगस्ट 2025 पासून यूसीओ बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, पीएसबी, केव्हीबी, अलाहाबाद बँक आणि इतर को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड्सवरील 1 कोटी आणि 50 लाखांचा इन्शुरन्स कव्हरेज बंद होईल. त्यामुळे आता क्रेडिट कार्डधारकांना विमान अपघात विम्याचा लाभ मिळणार नाही.

दरम्यान, प्रवाशांनी स्वतंत्र ट्रॅव्हल इन्शुरन्स निवडण्यापूर्वी पॉलिसी कागदपत्रे काळजीपूर्वक तपासावेत. ट्रॅव्हल इन्शुरन्समध्ये फ्लाइट अपघातामुळे मृत्यू किंवा अपंगत्वासाठी एकरकमी पेमेंट, हॉस्पिटल खर्च आणि आपत्कालीन वैद्यकीय स्थलांतर यांचा समावेश असतो. टाटा एआयजी, आयसीआयसीआय लोम्बार्ड, निवा बुपा, बजाज अलियांझ आणि केअर यांसारख्या कंपन्या असे प्लॅन्स देतात.

वारंवार हवाई प्रवास करणाऱ्यांसाठी सर्वसमावेशक कव्हरेज महत्त्वाचं आहे, कारण ते आर्थिक सुरक्षितता देते. ट्रॅव्हल इन्शुरन्समध्ये बॅगेज हरवणे, ट्रिप रद्द होणे, पासपोर्ट हरवणे किंवा वैयक्तिक जबाबदारी यासारखे इतर फायदेही असतात. प्रवाशांनी पॉलिसी डोमेस्टिक आणि आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी वैध आहे का, याची खात्री करावी. स्टँडअलोन फ्लाइट ॲक्सिडेंट इन्शुरन्स हा देखील एक पर्याय आहे, पण खरेदीपूर्वी अटी आणि वगळलेल्या गोष्टी तपासणं गरजेचं आहे.