पुणे – अकरावी प्रवेशाची आज पहिली गुणवत्ता यादी (merit list)दोन दिवसाआधी जाहीर करण्यात आली. न्यायालयीन प्रकरणे व तांत्रिक बाबींमुळे अकरावी प्रवेशाची गुणवत्ता यादी २६ जून रोजी जाहीर होणार होती. पण तांत्रिक अडचणींमुळे (technical issues) ती सोमवार ३० जून रोजी जाहीर केली जाणार होती. माात्र, आज mahafyjcadmissions.in या अधिकृत संकेतस्थळावर (official website) ती जाहीर करण्यात आली.
यंदा प्रथमच संपूर्ण राज्यात इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश (Online admission process)प्रक्रिया राबविण्यात येत आहे. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी राज्यभरातील ९,४३५ कनिष्ठ (junior college)महाविद्यालयांमधील २१,२३,७२० जागांसाठी ही प्रवेश प्रक्रिया होत आहे. आतापर्यंत १२,७१,२०१ विद्यार्थ्यांनी (students) नोंदणी केली असून, यामधून ‘कॅप’अंतर्गत १६,६०,०८४ जागा आणि व्यवस्थापन कोट्यात ४,६३,६३६ जागा उपलब्ध आहेत.
पहिल्या फेरीतील कॅप (Centralized Admission Process) आणि कोटा (management quota)अंतर्गत प्रवेशाच्या अनुषंगाने माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाने आज सुधारित वेळापत्रक जाहीर केले. या वेळापत्रकानुसार, महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांच्या अर्जातील तपशील आणि कागदपत्रांची पडताळणी करून प्रवेश नोंदवावा.प्रवेश रद्द करणे, नवीन विद्यार्थी नोंदणी आणि प्रवेश अर्ज भरणे ३० जून ते ७ जुलैपर्यंत करता येईल. तर ९ जुलैला दुसऱ्या फेरीसाठी रिक्त जागा प्रदर्शित केल्या जातील. विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉगिनमध्ये प्रवेशासाठी मिळालेल्या महाविद्यालयाची माहिती दिसेल.त्याचप्रमाणे संबंधित महाविद्यालयाच्या लॉगिनमध्ये त्या-त्या विद्यार्थ्यांची यादीही उपलब्ध होईल.विद्यार्थ्यांना यासंदर्भात एसएमएसद्वारे सूचना पाठविण्यात येणार आहेत.विद्यार्थ्यांनी मिळालेल्या महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करणे आवश्यक आहे.