पुणे – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात निवडणूक लढवणारे त्यांचे पुतणे (nephew) युगेंद्र पवार यांचा साखरपुडा(engagement) तनिष्का यांच्यासोबत पार पडला. शरद पवार राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी युगेंद्र पवार यांचा त्यांच्या होणाऱ्या पत्नी तनिष्का प्रभू (Tanishka Prabhu)सोबत फोटो एक्सवर पोस्ट केला आहे.
तनिष्का प्रभू मुंबईच्या असून तिचे शिक्षण परदेशामध्ये झाले. तनिष्काने फायनान्समध्ये शिक्षण घेतले आहे.यंदा पवार कुटुंबात दोन मोठे विवाहसोहळे होणार आहेत. यापूर्वी एप्रिलमध्ये अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार आणि उद्योजक प्रवीण पाटील यांच्या कन्या ऋतुजा पाटील यांचा साखरपुडा पार पडला.
सुप्रिया सुळे एक्सवर म्हणाल्या की, सर्वांना ही बातमी सांगताना खूप आनंद होत आहे . माझा भाचा युगेंद्रचा (Yugendra Pawar)साखरपुडा तनिष्काशी झाला आहे! त्यांना आयुष्यभर प्रेम, हास्य आणि एकत्र राहावे अशी शुभेच्छा. कुटुंबात तनिष्काचे स्वागत करताना खूप आनंद होत आहे.