Home / लेख / TVS Jupiter 110 आता नवीन अवतारात; स्पेशल एडिशन लाँच, किंमत खूपच कमी

TVS Jupiter 110 आता नवीन अवतारात; स्पेशल एडिशन लाँच, किंमत खूपच कमी

TVS Jupiter 110: TVS कंपनीने त्यांची सर्वाधिक विक्री होणारी स्कूटर TVS Jupiter 110 चे एक नवीन स्पेशल एडिशन लाँच केले...

By: Team Navakal
TVS Jupiter 110

TVS Jupiter 110: TVS कंपनीने त्यांची सर्वाधिक विक्री होणारी स्कूटर TVS Jupiter 110 चे एक नवीन स्पेशल एडिशन लाँच केले आहे. ‘स्टारडस्ट ब्लॅक’ (Stardust Black) नावाने लाँच करण्यात आलेला हे नवीन व्हेरिएंट आता Jupiter च्या लाइन-अपमधील सर्वात महागडे आणि टॉप-स्पेक मॉडेल बनले आहे.

TVS Jupiter 110: स्पेशल एडिशनमध्ये काय आहे खास?

या स्पेशल एडिशनला पूर्णपणे नवीन ‘ऑल-ब्लॅक’ लूक देण्यात आला आहे. स्कूटरच्या बॉडीवरील कंपनीचा लोगो आणि मॉडेलच्या नावाची सर्व बॅजिंग आता ब्राँझ (Bronze) कलरमध्ये आहे, तर इतर व्हेरिएंटमध्ये ती क्रोम कलरमध्ये असते.

या स्कूटरमधील केवळ एक्झॉस्ट हीट शील्डला क्रोम फिनिश देण्यात आली आहे, ज्यामुळे तिचा लूक अधिक आकर्षक दिसतो.

TVS Jupiter 110: किंमत आणि फीचर्स

TVS Jupiter 110 चे हाे स्पेशल एडिशन मेकॅनिकलदृष्ट्या Jupiter 110 DISC SXC व्हेरिएंटसारखेच आहे. यात फ्रंट डिस्क ब्रेक आणि ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह डिजिटल डिस्प्ले मिळतो.

या नवीन स्पेशल एडिशनची एक्स-शोरूम किंमत 93031 रुपये आहे. हे लाइन-अपमधील सर्वात महागडे मॉडेल आहे. यामुळे, TVS Jupiter 110 ही भारतातील दुसरी सर्वात महागडी 110cc स्कूटर ठरली आहे.

हे देखील वाचा – Navi Mumbai Airport: प्रतीक्षा संपली! ‘या’ तारखेला होणार नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
Topics:
संबंधित बातम्या