Home / महाराष्ट्र / Thackeray brothers: ठाणे पालिकेत ठाकरे बंधूंची अबकी बार ७५ पारची घोषणा

Thackeray brothers: ठाणे पालिकेत ठाकरे बंधूंची अबकी बार ७५ पारची घोषणा

Thackeray brothers – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे बंधूंचे (Thackeray brothers)...

By: Team Navakal
Thackeray brothers

Thackeray brothers – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे बंधूंचे (Thackeray brothers) नवे समीकरण उभे राहिले आहे. तर उबाठा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दोन ठाकरे सब पे भारी, अबकी बार ७५ पार अशी घोषणा ठाणे पालिकेसाठी केली.

खा. संजय राऊत म्हणाले की,ठाणे महानगरपालिकेत ठाकरे गट आणि मनसे एकत्र निवडणूक लढवणार आहेत. ठाण्यात दोन ठाकरे सबपे भारी होणार आहेत. आता दोन्ही भाऊ अबकी बार ७५ पार असतील. राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले आहेत. ज्यांना आमच्यासोबत यायचे आहे, आम्ही त्यांचे स्वागत करणार आहोत. आमची युती पक्की आहे. इंडिया आघाडी लोकसभेसाठी होती तर मविआ ही विधानसभेसाठी तयार केली होती. मनपा निवडणुकीसाठी अशी काही चर्चा झालेली नाही. मुंबई आणि मराठी माणूस वाचवण्यासाठी ठाकरे बंधू हे एकत्र आलेले आहेत.


हे देखील वाचा – 

सहकारी गृहनिर्माण संस्थांना पुनर्विकासासाठी ‘एनओसीची’ गरज नाही

जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरणात हायकोर्टात याचिका

पुन्हा शिवाजीराजे भोसले’चे निर्माते मांजरेकरांविरुद्ध दावा

Web Title:
संबंधित बातम्या