Home / महाराष्ट्र / Gold Silver Rate Update : मागच्या २४ तास सोन्याच्या दरात मोठी घसरण..

Gold Silver Rate Update : मागच्या २४ तास सोन्याच्या दरात मोठी घसरण..

Gold Silver Rate Update : सोने आणि चांदीचे दर कमी होतील कि नाही या बाबत कायमच शंका असते कारण दार...

By: Team Navakal
Gold Silver Rate Update

Gold Silver Rate Update : सोने आणि चांदीचे दर कमी होतील कि नाही या बाबत कायमच शंका असते कारण दार कायमच वाढताना दिसतात. पण आता सोने आणि चांदीचे दर उच्चांकावर पोहोचल्यानंतर आता याच दरात मोठी घसरण होताना दिसत आहे. गेल्या चोवीस तासात सोन्याच्या (Gold price) आणि चांदीच्या (Silver Price) दरात मोठ्या प्रमाणावर घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे.

सोमवारी सोन्याचे दर जीएसटी (GST) शिवाय १,२२,५०० इतके असताना त्यात आज 4, 300 रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे आत त्याची एकूण किंमत १,१८,२०० रुपये झाली आहे. तर चांदीच्या दरात देखील सहा हजार रुपयांची मोठी घसरण झाली आहे. तर चांदीचे दर १,५१,००० वरून १,४५,००० रुपयांवर आले आले आहेत.

दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी सोने अजूनही सर्वात सुरक्षित आणि विश्वासार्ह पर्याय मानला जातो. २४ कॅरेट सोने सामान्यतः गुंतवणूकीच्या उद्देशाने खरेदी केले जाते, तर १८आणि २२कॅरेट सोने दागिने बनवण्यासाठी अधिक प्रमाणात वापरले जाते.


हे देखील वाचा –

Mahayuti Cabinet : दिवाळीनंतरच्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय..

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या