Home / मनोरंजन / Kartik Aaryan : कार्तिक आर्यन 18 वर्षांच्या मुलीला करतोय डेट? कथित गर्लफ्रेंडची प्रतिक्रिया आली समोर

Kartik Aaryan : कार्तिक आर्यन 18 वर्षांच्या मुलीला करतोय डेट? कथित गर्लफ्रेंडची प्रतिक्रिया आली समोर

Kartik Aaryan : बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता कार्तिक आर्यन सध्या एका अनपेक्षित वादात अडकला आहे. नुकताच त्याचा ‘तू मेरी मैं तेरा,...

By: Team Navakal
Kartik Aaryan
Social + WhatsApp CTA

Kartik Aaryan : बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता कार्तिक आर्यन सध्या एका अनपेक्षित वादात अडकला आहे. नुकताच त्याचा ‘तू मेरी मैं तेरा, मैं तेरा तू मेरी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला असून, यात तो अनन्या पांडेसोबत मुख्य भूमिकेत आहे. मात्र, सध्या त्याच्या चित्रपटापेक्षा त्याच्या वैयक्तिक आयुष्याचीच चर्चा सोशल मीडियावर जास्त होताना दिसत आहे.

नेमका वाद काय?

कार्तिक आर्यनने गोव्यातील सुट्ट्यांदरम्यान सूर्यास्ताचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. योगायोगाने, त्याच वेळी एका मुलीनेही अगदी त्याच ठिकाणचा फोटो पोस्ट केला. ‘रेडिट’वरील युझर्सनी हे दोन्ही फोटो शोधून काढले आणि कार्तिक त्या मुलीला डेट करत असल्याचा दावा केला.

चर्चा इतकी टोकाला गेली की, नेटीझन्सनी संबंधित मुलगी केवळ 18 वर्षांची असल्याचे शोधून काढले, ज्यामुळे नवीन वादाला तोंड फुटले.

संबंधित मुलीने दिले स्पष्टीकरण

या अफवांवर अखेर संबंधित मुलीने स्वतः उत्तर दिले आहे. सोशल मीडियावरील एका कमेंटला रिप्लाय देताना तिने स्पष्ट शब्दांत सांगितले की, “मी त्याची गर्लफ्रेंड नाही!” या एका विधानाने तिने सर्व चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे. कार्तिक किंवा त्याच्या टीमने या प्रकरणावर अद्याप अधिकृत भाष्य केलेले नाही.

कार्तिक काय म्हणतो?

कार्तिक आर्यनने नेहमीच आपले खाजगी आयुष्य प्रसिद्धीपासून दूर ठेवले आहे. त्याने अलीकडेच एका मुलाखतीत सांगितले होते की, “प्रसिद्धीच्या झोतात असताना नात्याचा आदर राखणे महत्त्वाचे असते. मीडियामध्ये अनेक गोष्टी रंगवल्या जातात, पण ऐकलेली प्रत्येक गोष्ट खरी नसते.”

कार्तिकचा नवीन चित्रपट ‘तू मेरी मैं तेरा, मैं तेरा तू मेरी’ सध्या चित्रपटगृहात असून, प्रदर्शनानंतर काही दिवसांतच अभिनेता अशा वादात अडकल्याने चाहत्यांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे.

हे देखील वाचा – Healthy Breakfast: चक्क नाश्त्यात खा ‘चॉकलेट केक’! फक्त 7 साहित्यात तयार होणारी ही हाय-प्रोटिन रेसिपी एकदा नक्की ट्राय करा

Web Title:
संबंधित बातम्या