Home / महाराष्ट्र / Dharashiv News : ऑडिओ क्लिप प्रकरणी अविनाश खापे निलंबित

Dharashiv News : ऑडिओ क्लिप प्रकरणी अविनाश खापे निलंबित

Dharashiv News : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिप प्रकरणी युवा सेनेचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य...

By: Team Navakal
Dharashiv News
Social + WhatsApp CTA

Dharashiv News : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिप प्रकरणी युवा सेनेचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य अविनाश खापे यांच्यावर पक्षातून निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

मागील आठवड्यात शिंदे गटाचे जिल्हा संपर्कप्रमुख राजन साळवी आणि अविनाश खापे यांच्यातील कथित दूरध्वनी संभाषणाची ऑडिओ क्लिप समाजमाध्यमांवर व्हायरल झाली होती. या क्लिपमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीसाठी शिंदे गटाचे एबी फॉर्म भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील आणि त्यांचे पुत्र मल्हार पाटील यांच्या हस्ते वाटप झाल्याचा आरोप ऐकू येत असल्याचे सांगितले जाते.

या संभाषणात पक्षांतर्गत निर्णयप्रक्रियेवर नाराजी व्यक्त होत असल्याचेही ऐकू येते. “संपर्कप्रमुख म्हणून निर्णय तुम्ही घ्यायला हवेत, पक्षात लोकशाही उरलेली नाही,” अशा आशयाचे वक्तव्य क्लिपमध्ये असल्याचा दावा केला जात आहे. तसेच विधानसभा निवडणुकीनंतरच्या राजकीय घडामोडींवरही प्रश्न उपस्थित करण्यात आल्याचे बोलले जाते.

ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. 25 जानेवारी रोजी शिंदे गटाचे जिल्हा संघटक सुधीर पाटील यांच्या निवासस्थानी पालकमंत्री प्रताप सरनाईक आणि संपर्कप्रमुख राजन साळवी यांच्या उपस्थितीत काही शिवसैनिकांनी गोंधळ घातल्याचीही घटना घडली होती. या सर्व पार्श्वभूमीवर, युवा सेनेचे सचिव राहुल लोंढे यांनी पत्र काढून अविनाश खापे यांना पक्षातून निलंबित केल्याचे जाहीर केले.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या