RBI Office Attendant Recruitment 2026: बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) आनंदाची बातमी दिली आहे. रिझर्व्ह बँकेत ‘ऑफिस अटेंडंट’ पदांच्या एकूण ५७२ जागा भरण्यासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. या भरतीसाठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सध्या सुरू असून, इच्छुक उमेदवार बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात.
महत्त्वाच्या तारखा आणि निवड प्रक्रिया
या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ फेब्रुवारी २०२६ आहे. उमेदवारांची निवड दोन टप्प्यांत केली जाईल. पहिल्या टप्प्यात ऑनलाइन लेखी परीक्षा घेतली जाईल आणि त्यामध्ये यशस्वी होणाऱ्या उमेदवारांची दुसऱ्या टप्प्यात प्रादेशिक भाषा प्रवीणता चाचणी (LPT) घेतली जाईल.
पात्रता निकष काय आहेत?
१. शैक्षणिक पात्रता: उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्डातून १० वी (मॅट्रिक्युलेशन) परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. विशेष म्हणजे, पदवीधर (Graduates) किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षण झालेले उमेदवार या पदासाठी पात्र नाहीत.
२. वयोमर्यादा: १ जानेवारी २०२६ रोजी उमेदवाराचे वय १८ ते २५ वर्षांच्या दरम्यान असावे. सरकारी नियमांनुसार आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना वयात सवलत दिली जाईल.
३. भाषिक ज्ञान: उमेदवाराला संबंधित राज्याची स्थानिक भाषा वाचता, लिहिता आणि बोलता येणे अनिवार्य आहे.
अर्जाचे शुल्क
- SC/ST/PwBD/माजी सैनिक: ५० रुपये अधिक जीएसटी.
- सामान्य/OBC/EWS प्रवर्ग: ४५० रुपये अधिक जीएसटी.
ऑनलाइन अर्ज कसा करावा?
१. प्रथम रिझर्व्ह बँकेच्या अधिकृत वेबसाइट rbi.org.in ला भेट द्या.
२. तेथे ‘Careers’ विभागातील ‘Current Vacancies’ या पर्यायावर क्लिक करा.
३. ‘Office Attendant Recruitment 2026’ या लिंकवर जाऊन ‘Apply Online’ वर क्लिक करा.
४. आपली वैयक्तिक माहिती भरून नोंदणी करा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
५. अर्जाचे शुल्क भरून फॉर्म सबमिट करा आणि भविष्यातील संदर्भासाठी प्रिंटआउट काढून ठेवा.
दहावी पास तरुणांसाठी सरकारी बँकेत नोकरी मिळवण्याची ही एक उत्तम संधी आहे. ४ फेब्रुवारीपूर्वी आपला अर्ज निश्चित करा.











