Home / महाराष्ट्र / Sharad Pawar on NCP Merger : राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा गुंता वाढला; शरद पवारांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना खोचक प्रतिसवाल

Sharad Pawar on NCP Merger : राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा गुंता वाढला; शरद पवारांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना खोचक प्रतिसवाल

Sharad Pawar on NCP Merger : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनानंतर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या पुनर्मिलनावरून महाराष्ट्राच्या...

By: Team Navakal
Sharad Pawar on NCP Merger
Social + WhatsApp CTA

Sharad Pawar on NCP Merger : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनानंतर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या पुनर्मिलनावरून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे वादंग निर्माण झाले आहे. २८ जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा अंत झाला. मात्र, त्यांच्या निधनानंतर आता शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील ‘विलीनीकरणाच्या’ कथित गुप्त चर्चेवरून राजकीय दावे-प्रतिदावे सुरू झाले आहेत.

विलीनीकरणाचा दावा आणि फडणवीसांचे खंडन-
शरद पवार गटातील नेत्यांच्या दाव्यानुसार, १७ जानेवारी रोजी जयंत पाटील यांच्या निवासस्थानी दोन्ही गटांच्या विलीनीकरणाबाबत एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली होती. या बैठकीला स्वतः शरद पवार आणि अजित पवार उपस्थित होते, असे सांगितले जाते. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा दावा पूर्णतः फेटाळून लावला आहे. “अजित पवार माझ्याशी सर्व महत्त्वाच्या गोष्टी सामायिक करत असत. जर विलीनीकरणासारखा मोठा निर्णय झाला असता, तर त्यांनी मला निश्चितपणे कल्पना दिली असती,” असे फडणवीस यांनी स्पष्ट केले होते.

शरद पवारांचा टोला: “जे चर्चेत नव्हते, त्यांना काय ठाऊक?”
मुख्यमंत्र्यांच्या या दाव्यावर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सोमवारी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना कडक शब्दांत प्रत्युत्तर दिले. पवारांनी थेट सवाल उपस्थित केला की, “विलीनीकरणाच्या त्या चर्चेत जे नेते प्रत्यक्ष उपस्थित नव्हते, त्यांना त्या बैठकीत काय घडले याची माहिती कशी असणार?” शरद पवारांचे हे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार गटाच्या त्या नेत्यांना एक प्रकारचे आव्हान मानले जात आहे, जे विलीनीकरणाची चर्चा झालीच नसल्याचे वारंवार सांगत आहेत. या विधानामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणाबाबतच्या चर्चेला आता नवीन वळण मिळाले आहे.

संसदेचे अधिवेशन आणि आगामी राजकीय घडामोडी-
एककीकडे राज्यात विलीनीकरणाच्या चर्चांचे वादळ घोंगावत असताना, शरद पवार मंगळवारी दिल्लीकडे रवाना होणार आहेत. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या (Budget Session 2026) कामकाजात ते सहभागी होतील. दोन दिवस दिल्लीत संसदीय जबाबदाऱ्या पार पाडल्यानंतर ते पुन्हा बारामतीला परतणार आहेत. त्यांच्या या दिल्ली दौऱ्यात आणि त्यानंतरच्या बारामती वास्तव्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या भवितव्याबाबत काही ऐतिहासिक आणि महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवण्यात येत आहे.

हे देखील वाचा – Sanjay Raut on Ajit Pawar Death : अजितदादांच्या नावावर खोटी बिले फाडू नका; संजय राऊतांचा मुख्यमंत्री फडणवीसांवर घणाघात- ‘घातपाताचा’ संशय आणि आरोप-प्रत्यारोपांची राळ

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या