Home / महाराष्ट्र / MHada Lottery 2026: मुंबईत हक्काच्या घराचे स्वप्न होणार पूर्ण! म्हाडाच्या 120 घरांची ‘प्रथम येईल त्यास प्राधान्य’ तत्त्वावर विक्री

MHada Lottery 2026: मुंबईत हक्काच्या घराचे स्वप्न होणार पूर्ण! म्हाडाच्या 120 घरांची ‘प्रथम येईल त्यास प्राधान्य’ तत्त्वावर विक्री

MHada Lottery 2026: मुंबईत स्वतःच्या घराचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांसाठी म्हाडाने एक मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण...

By: Team Navakal
MHada Lottery 2026
Social + WhatsApp CTA

MHada Lottery 2026: मुंबईत स्वतःच्या घराचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांसाठी म्हाडाने एक मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाच्या अखत्यारीतील विविध वसाहतींमधील 120 सदनिका आता ‘प्रथम येईल त्यास प्रथम प्राधान्य’ (First Come First Served) या तत्त्वावर विकल्या जाणार आहेत. या सदनिकांच्या नोंदणी प्रक्रियेला 5 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 11:00 वाजल्यापासून सुरुवात होणार आहे.

घरे कोणत्या भागात आहेत?

या योजनेमध्ये पूर्वीच्या सोडतीत शिल्लक राहिलेल्या घरांचा समावेश आहे. घरांची विभागणी दोन मुख्य गटांत करण्यात आली आहे:

  1. मंडळाने बांधलेली घरे (84 सदनिका):
    • कांदिवली (शिंपोली आणि चारकोप): 10 सदनिका
    • पवई (तुंगा): 44 सदनिका
    • वडाळा (अँटॉप हिल): 27 सदनिका
    • मानखुर्द आणि मालाड: 03 सदनिका
  2. विकास नियंत्रण नियमावली (33-5-7) अंतर्गत प्राप्त घरे (36 सदनिका):
    • वडाळा, भायखळा, ताडदेव: 20 सदनिका
    • लोअर परळ, सायन, विक्रोळी आणि घाटकोपर: 09 सदनिका
    • अंधेरी पश्चिम (जेव्हीपीडी): 07 सदनिका

अर्ज प्रक्रिया आणि महत्त्वाच्या तारखा

  • नोंदणी: 5 फेब्रुवारी 2026 पासून म्हाडाच्या https://bookmyhome.mhada.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी सुरू होईल.
  • सदनिका निवडणे: 12 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 11:00 वाजल्यापासून नागरिक प्रत्यक्ष सदनिका निश्चित करून अनामत रक्कम भरू शकतील.
  • पेमेंट नियम: सदनिका बुक केल्यानंतर 48 तासांच्या आत घराच्या एकूण किमतीच्या 10 टक्के रक्कम भरणे अनिवार्य आहे.

पात्रतेसाठी काय लागेल?

अर्जदाराचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त असावे आणि तो भारतीय नागरिक असावा. अर्जासाठी पॅन कार्ड, आधार कार्ड (मोबाईल क्रमांकाशी लिंक असलेले), पती-पत्नीचे तपशील (विवाहित असल्यास) आणि आरक्षित प्रवर्गासाठी जात प्रमाणपत्र आवश्यक आहे.

पैशांचा भरणा आणि अटी

१. १० टक्के रक्कम: सदनिका बुक केल्यानंतर 48 तासांत 10 टक्के रक्कम न भरल्यास तुमचे बुकिंग रद्द होईल आणि भरलेली अनामत रक्कम जप्त केली जाईल. २. उर्वरित रक्कम: ताप्तपुरते देकार पत्र (Provisional Offer Letter) मिळाल्यावर पुढील 90 दिवसांत उर्वरित 90 टक्के रक्कम भरावी लागेल. ३. परतावा: जर काही कारणास्तव वाटप रद्द झाले, तर घराच्या किमतीच्या 1 टक्का रक्कम वजा करून उर्वरित पैसे परत मिळतील.

म्हाडाने स्पष्ट केले आहे की, या कामासाठी कोणाही दलाल किंवा एजंटची नेमणूक केलेली नाही. नागरिकांनी कोणत्याही फसवणुकीला बळी पडू नये आणि अधिकृत वेबसाईटचाच वापर करावा.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या