Home / देश-विदेश / Surajkund Mela Accident: जत्रेत आनंददायी प्रवास बनला काळ! झुलता पाळणा कोसळला; लोकांना वाचवताना पोलिसाचा मृत्यू

Surajkund Mela Accident: जत्रेत आनंददायी प्रवास बनला काळ! झुलता पाळणा कोसळला; लोकांना वाचवताना पोलिसाचा मृत्यू

Surajkund Mela Accident: हरियाणातील फरिदाबाद येथे भरलेल्या जगप्रसिद्ध ‘सूरजकुंड’ जत्रेत शनिवारी संध्याकाळी एका भीषण अपघाताने खळबळ उडाली. जत्रेतील एक मोठा...

By: Team Navakal
Surajkund Mela Accident
Social + WhatsApp CTA

Surajkund Mela Accident: हरियाणातील फरिदाबाद येथे भरलेल्या जगप्रसिद्ध ‘सूरजकुंड’ जत्रेत शनिवारी संध्याकाळी एका भीषण अपघाताने खळबळ उडाली. जत्रेतील एक मोठा झुलता पाळणा अचानक कोसळल्याने या दुर्घटनेत 13 जण जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे, संकटात सापडलेल्या पर्यटकांना वाचवण्यासाठी देवदूतासारखे धावलेले पोलीस निरीक्षक जगदीश प्रसाद यांना आपला जीव गमवावा लागला आहे.

बचावकार्य करताना बजावले कर्तव्य

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी संध्याकाळी 6:15 च्या सुमारास हा अपघात झाला. जत्रेतील एक झुलता पाळणा एका बाजूला झुकत असल्याचे पाहून तिथे ड्युटीवर तैनात असलेले पोलीस निरीक्षक जगदीश प्रसाद यांनी तत्काळ धाव घेतली. पाळण्यातील लोकांना बाहेर काढत असतानाच पाळण्याचा एक मोठा भाग त्यांच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर जोरात आदळला. गंभीर जखमी झालेल्या प्रसाद यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत दोन महिला पोलीस कर्मचारी देखील जखमी झाल्या आहेत.

13 पर्यटक जखमी, चौकशी सुरू

ज्या वेळी हा अपघात झाला, त्या वेळी पाळण्यावर सुमारे 26 लोक स्वार होते. या अपघातात एकूण 13 जण जखमी झाले असून, त्यापैकी 2 ते 3 जणांना गंभीर दुखापत झाली आहे. जखमींना तातडीने रुग्णवाहिकेने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच उपायुक्त, पर्यटन विभागाचे व्यवस्थापकीय संचालक आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत प्रशासनाने एफआयआर दाखल केला आहे. घटनेच्या चौकशीसाठी अतिरिक्त उपायुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे. मुख्यमंत्री नायब सैनी यांनी सोशल मीडियावरून या घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून मृतांच्या कुटुंबाला सांत्वन दिले आहे. तसेच जखमींना सर्वतोपरी वैद्यकीय मदत देण्याचे निर्देश दिले आहेत.

प्रशासनाने स्पष्ट केले की, सर्व पाळण्यांचे सुरक्षा प्रमाणपत्र तपासूनच त्यांना परवानगी दिली जाते, तरीही हा अपघात नेमका तांत्रिक बिघाडामुळे झाला की इतर काही कारणाने, याचा तपास समितीच्या अहवालानंतर स्पष्ट होईल.

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या