Home / महाराष्ट्र / CRS portal hacked : सोयगावात ३,४४८ बोगस जन्मनोंदी; बिहारमधून सीआरएस पोर्टल हॅक?

CRS portal hacked : सोयगावात ३,४४८ बोगस जन्मनोंदी; बिहारमधून सीआरएस पोर्टल हॅक?

CRS portal hacked – Chhatrapati Sambhajinagar जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यात (Soygaon taluka) परप्रांतीयांच्या तब्बल ३ हजार ४४८ बोगस जन्मनोंदी (birth records)...

By: Team Navakal
CRS portal hacked
Social + WhatsApp CTA

CRS portal hacked – Chhatrapati Sambhajinagar जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यात (Soygaon taluka) परप्रांतीयांच्या तब्बल ३ हजार ४४८ बोगस जन्मनोंदी (birth records) आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. अवघी साडेचार हजार लोकसंख्या (population) असलेल्या गावात केवळ चार महिन्यांत साडेतीन हजारांहून अधिक जन्मनोंदी झाल्याचा प्रकार समोर आल्याने प्रशासनही सतर्क झाले आहे.


सोयगाव तालुक्यातील मोहळाई ग्रुप ग्रामपंचायतीअंतर्गत मोहळाई आणि पिंप्री अंतुर (Mohlai and Pimpri Antur)ही दोन गावे येतात. या ग्रामपंचायतीचे मुख्यालय मोहळाई येथे आहे. ग्रामपंचायतीच्या सीआरएस (Civil Registration System) पोर्टलच्या युजर आयडीद्वारे मौजे पिंप्री अंतुर येथे १ एप्रिल २०२५ ते २ ऑगस्ट २०२५ या कालावधीत ३ हजार ४४८ जन्मनोंदी आणि आठ मृत्यूनोंदी करण्यात आल्याची नोंद आढळली.


याबाबत ग्रामसेवक तुळशीदास गोसावी (Gram Sevak Tulshidas Gosavi)यांनी संगणक परिचालकाकडे चौकशी केली असता संबंधित युजर आयडी वापरात नसल्याचे सांगण्यात आले. मग इतक्या मोठ्या प्रमाणात नोंदी कशा झाल्या, असा प्रश्न निर्माण झाल्यानंतर सखोल तपास करण्यात आला. जिल्हा आरोग्याधिकारी कार्यालयातील सांख्यिकी अधिकाऱ्यांनी तपास केला असता, संबंधित युजर आयडीचा पासवर्ड बिहारमधील एका व्यक्तीने ‘हॅक’ करून या बनावट नोंदी केल्याचा प्रकार उघडकीस आला.


ही बाब तात्काळ राज्याच्या आरोग्यविषयक माहिती व जन्म-मृत्यू विभागाच्या संचालकांना (Director of the State Health Information and Birth and Death)कळविण्यात आली. त्यानंतर अज्ञात व्यक्तीविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करून संबंधित सर्व नोंदी रद्द करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानुसार सोयगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.या प्रकारामुळे ग्रामपंचायत पातळीवरील सायबर सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.


हे देखील वाचा –

आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघातील लक्ष्मीनारायण मंदिराला पाडकामाची नोटीस; मंदिर स्थलांतराचा मुद्दा तापला

नसे विद्यार्थी सेनेत अंतर्गत नाराजी? भोसले यांची एक्झिट ; संयम की विचारबदल?

रिलायन्स रुग्णालयात तेजस ठाकरे यांच्यावर उपचार : उद्धव-रश्मी ठाकरे रुग्णालयात

 डोंबिवलीत पहाटे ४.१५ वाजता बेसमेंटमध्ये आग; २९ दुचाकी जळून खाक ; ५ जखमी

Web Title:
संबंधित बातम्या