Home / देश-विदेश / POCSO Court Verdict: ३३ निष्पाप मुलांचे शोषण आणि अश्लील फिल्म्सची विक्री; नराधम पती-पत्नीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा

POCSO Court Verdict: ३३ निष्पाप मुलांचे शोषण आणि अश्लील फिल्म्सची विक्री; नराधम पती-पत्नीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा

POCSO Court Verdict: उत्तर प्रदेशातील चित्रकूट जिल्ह्यातून माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना समोर आली होती, ज्यावर आता न्यायालयाने अंतिम मोहोर...

By: Team Navakal
POCSO Court Verdict: ३३ निष्पाप मुलांचे शोषण आणि अश्लील फिल्म्सची विक्री; नराधम पती-पत्नीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा
Social + WhatsApp CTA

POCSO Court Verdict: उत्तर प्रदेशातील चित्रकूट जिल्ह्यातून माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना समोर आली होती, ज्यावर आता न्यायालयाने अंतिम मोहोर उमटवली आहे. ३३ लहान मुलांचे लैंगिक शोषण करून त्यांच्या अश्लील फिल्म्स डार्क वेबवर विकणाऱ्या नराधम पती-पत्नीला बांदा येथील विशेष पोक्सो न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. हे प्रकरण ‘दुर्मिळातील दुर्मिळ’ असल्याचे सांगत न्यायालयाने गुन्हेगारांना कोणतीही दया दाखवण्यास नकार दिला.

असे उघड झाले अंगावर शहारे आणणारे कृत्य

सिंचन विभागात कनिष्ठ अभियंता असलेला राम भवन आणि त्याची पत्नी दुर्गावती हे २०१० ते २०२० या काळात या घाणेरड्या कृत्यात सहभागी होते. राम भवन हा लहान मुलांना व्हिडिओ गेम्स खेळण्याचे आमिष दाखवून किंवा पैशांचे लालच देऊन आपल्या घरी न्यायचा. तिथे तो मुलांवर अत्याचार करायचा, तर त्याची पत्नी या कामात त्याला मदत करायची. धक्कादायक म्हणजे, या कृत्याचे व्हिडिओ बनवून ते परदेशातील ग्राहकांना डार्क वेबच्या माध्यमातून विकले जात होते.

सीबीआय तपासात धक्कादायक खुलासे

२०२१ मध्ये या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला होता. छापेमारी दरम्यान आरोपींच्या घरातून ८ लाख रुपयांची रोकड, १२ मोबाईल फोन, लॅपटॉप आणि अनेक पेन ड्राईव्ह जप्त करण्यात आले. फॉरेन्सिक तपासणीत या उपकरणांमध्ये मोठ्या प्रमाणावर आक्षेपार्ह साहित्य आढळले. या दांपत्याने केवळ शोषणच केले नाही, तर पीडित मुलांना आणि त्यांच्या कुटुंबाला धमकावून गप्पही केले होते.

पीडितांची अवस्था आणि न्यायालयाचे आदेश

या क्रूर अत्याचारामुळे अनेक मुलांच्या शरीरावर गंभीर जखमा झाल्या आहेत. काही मुलांची मानसिक स्थिती खालावली असून काहींना शारीरिक व्यंगही आले आहे. न्यायालयाने या मुलांच्या पुनर्वसनासाठी राज्य सरकारला ठोस पावले उचलण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, प्रत्येक पीडित कुटुंबाला १० लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

न्यायालयाने म्हटले की, अशा गुन्ह्यांमुळे समाजाचा नैतिक पाया हादरतो. अशा गुन्हेगारांना दिलेली फाशीची शिक्षा ही इतरांसाठी एक मोठा धडा ठरेल.

Web Title:
For more updates: , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या