Home / महाराष्ट्र / Rohit Pawar : अजित पवार अपघात प्रकरण: रोहित पवारांचा तक्रार अर्ज गुन्हे शाखेकडे वर्ग

Rohit Pawar : अजित पवार अपघात प्रकरण: रोहित पवारांचा तक्रार अर्ज गुन्हे शाखेकडे वर्ग

Rohit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघात प्रकरणी आता राजकीय घडामोडींना वेग आला असून, या प्रकरणाला नवीन वळण मिळाले...

By: Team Navakal
Rohit Pawar
Social + WhatsApp CTA

Rohit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघात प्रकरणी आता राजकीय घडामोडींना वेग आला असून, या प्रकरणाला नवीन वळण मिळाले आहे. आमदार रोहित पवार यांनी या अपघाताची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर, रोहित पवार यांनी बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी आले आहेत. याप्रसंगी त्यांच्यासोबत युगेंद्र पवार हे देखील उपस्थित होते, ज्यामुळे या प्रकरणाला कौटुंबिक आणि राजकीय संघर्षाची जोड मिळाल्याचे दिसून येत आहे.

अधिकच्या माहितीनुसार, रोहित पवार यांनी सादर केलेला हा तक्रार अर्ज आता पुढील तपासासाठी गुन्हे शाखेकडे (Crime Branch) वर्ग करण्यात आला आहे. कायदेशीर प्रक्रियेनुसार, कोणत्याही गंभीर तक्रारीनंतर प्रथम अर्जाची दखल घेतली जाते, त्यानंतर प्राथमिक चौकशी पूर्ण करून तथ्यांच्या आधारे प्रथम खबरीत अहवाल म्हणजेच ‘एफआयआर’ (FIR) नोंदवला जातो. याच प्रक्रियेचा भाग म्हणून आता गुन्हे शाखा या प्रकरणातील तांत्रिक बाबी आणि कंपनीची भूमिका यांची तपासणी करणार आहे.

सध्या बारामतीत मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय जमा झाला आहे. पोलीस ठाण्याच्या परिसरात कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती, रोहित पवार पोलीस ठाण्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधत असताना, बाहेरच्या बाजूला बारामतीकरांचा आणि कार्यकर्त्यांचा प्रचंड जनसमुदाय उसळला आहे. “आम्हाला सत्य हवे आहे” आणि “विमान कंपनीची चौकशी झालीच पाहिजे” अशा घोषणांनी पोलीस ठाण्याचा परिसर दणाणून गेला आहे. या गर्दीत केवळ राजकीय कार्यकर्तेच नव्हे, तर अजितदादांवर प्रेम करणारे सामान्य नागरिकही मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या