Ajit Pawar Plane Crash Report – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारी २०२६ रोजी विमान अपघातात निधन झाले होते. मुंबईहून बारामतीकडे जात असताना त्यांच्या विमानाचा बारामती विमानतळाजवळ अपघात झाला होता. या घटनेमुळे राज्यभर खळबळ उडाली होती. अनेकांनी हा अपघात की घात, असा प्रश्न उपस्थित केला होता.

दरम्यान, या प्रकरणी DGCA (Directorate General of Civil Aviation) आणि AAIB (Aircraft Accident Investigation Bureau) यांचा २२ पानांचा प्राथमिक अहवाल समोर आला आहे. या अहवालात अपघाताच्या कारणांबाबत काही महत्त्वाची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे.
अहवालानुसार, विमान बारामती (Baramati )विमानतळावर लँडिंगसाठी येत असताना प्रथम एका झाडाला धडकले आणि त्यानंतर खाली कोसळले. अपघाताच्या वेळी परिसरात सुमारे २ हजार मीटर इतकी दृष्यमानता होती. विमान रनवेपासून सुमारे ५० मीटर अंतरावर कोसळल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.
तपासादरम्यान विमानातील रॉ डेटा यशस्वीपणे डाउनलोड करण्यात आला असून विविध तांत्रिक पुरावे गोळा करण्यात आले आहेत. संबंधित कागदपत्रांची तपासणी करून त्यावर विश्लेषण करण्यात आले आहे. तसेच या प्रकरणाशी संबंधित महत्त्वाच्या व्यक्तींची चौकशीही करण्यात आली आहे.
अहवालात नमूद केल्याप्रमाणे, विमानातील दोन्ही वैमानिकांना बारामती विमानतळावर विमान उतरवण्याचा अनुभव होता. अपघातास कारणीभूत असलेल्या सर्व पैलूंचा सखोल तपास सुरू असल्याचे तपास यंत्रणांनी स्पष्ट केले आहे.
हे देखील वाचा –
Israel-Iran युद्धाचा भडका; १०५ क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला, भारतीयांसाठी ‘हाय अलर्ट’










