Home / लेख / Holi 2026 : होळी 2 की 3 मार्चला? पंचांगकर्त्यांनी सांगितला नेमका मुहूर्त

Holi 2026 : होळी 2 की 3 मार्चला? पंचांगकर्त्यांनी सांगितला नेमका मुहूर्त

Holi 2026 : हिंदू संस्कृतीतील उत्साहाचा सण म्हणजेच होळी. दरवर्षी फाल्गुन पौर्णिमेला हा सण साजरा होतो, मात्र २०२६ मध्ये ग्रह-ताऱ्यांची...

By: Team Navakal
Holi 2026
Social + WhatsApp CTA

Holi 2026 : हिंदू संस्कृतीतील उत्साहाचा सण म्हणजेच होळी. दरवर्षी फाल्गुन पौर्णिमेला हा सण साजरा होतो, मात्र २०२६ मध्ये ग्रह-ताऱ्यांची स्थिती, भद्रा काळ आणि चंद्रग्रहण यांमुळे होळीच्या तारखेबाबत लोकांच्या मनात शंका निर्माण झाली आहे. होळी नक्की २ मार्चला आहे की ३ मार्चला? या प्रश्नाचे सविस्तर उत्तर पंचांगकर्ते मोहन दाते यांनी दिले आहे.

होलिका दहन कधी करावे?

पंचांगानुसार, फाल्गुन पौर्णिमा २ मार्च २०२६ रोजी संध्याकाळी ५:५५ वाजता सुरू होणार असून ती ३ मार्च रोजी संध्याकाळी ५:०७ वाजेपर्यंत असेल. शास्त्रांनुसार, होलिका दहन प्रदोष काळात करणे शुभ मानले जाते. त्यामुळे २ मार्च २०२६ रोजीच होलिका दहन केले जाईल. ३ मार्च रोजी पहाटे १:२५ ते ४:३० या वेळेत भद्रा काळ असल्याने त्या काळात पूजा करणे निषिद्ध मानले जाते.

  • होलिका दहनाचा शुभ मुहूर्त: २ मार्च रोजी संध्याकाळी ६:२२ ते रात्री ८:५० पर्यंत.

धुलिवंदन आणि चंद्रग्रहणाचे सावट

यावर्षी ३ मार्च २०२६ रोजी धुलिवंदन साजरे केले जाणार आहे. मात्र, याच दिवशी वर्षातील पहिले चंद्रग्रहण देखील होत आहे. हे अंशतः चंद्रग्रहण असून ते भारतात ‘ग्रस्तोदित’ स्वरूपात दिसणार आहे.

  • ग्रहणाची वेळ: भारतीय वेळेनुसार दुपारी ३:०० वाजता ग्रहण सुरू होईल आणि संध्याकाळी ६:४८ वाजता संपेल. भारतात हे ग्रहण संध्याकाळी ६:०० च्या सुमारास स्पष्टपणे दिसू शकेल.
  • सुतक काळ: चंद्रग्रहणाचा सुतक काळ ३ मार्च रोजी सकाळी ९:०० वाजता सुरू होईल. ग्रहणाचा एकूण कालावधी ३ तास २७ मिनिटे असणार आहे. हे ग्रहण भारत, आशिया, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेच्या काही भागांतून दिसणार आहे.

थोडक्यात सांगायचे तर, २ मार्चला होलिका दहन आणि ३ मार्चला धुलिवंदन साजरे होईल. ३ मार्चला सकाळी ९:०० नंतर सुतक काळ सुरू होणार असल्याने धार्मिक विधी त्यापूर्वी उरकणे सोयीचे ठरेल.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
Topics:
संबंधित बातम्या