Best Mileage 125cc Bikes: आजच्या काळात बाईक खरेदी करताना ग्राहक केवळ लूकच नाही, तर इंधनाची किती बचत होते याला सर्वाधिक महत्त्व देतात. विशेषतः मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी १२५cc श्रेणीतील बाईक्स एक वरदान ठरत आहेत, कारण यात पॉवर आणि मायलेजचा अचूक समतोल साधलेला असतो.
तुम्ही जर ऑफिसला जाण्यासाठी किंवा दररोजच्या कामासाठी नवीन बाईक घेण्याच्या विचारात असाल, तर भारतीय बाजारपेठेतील खालील ५ मॉडेल्स तुमच्यासाठी पैशांची वसुली (Value for money) ठरू शकतात.
१. TVS Raider 125
तरुणांच्या पसंतीस उतरलेली ही बाईक परफॉर्मन्स आणि इंधन बचतीचा उत्तम नमुना आहे. याचे १२४.८cc इंजिन असून ते केवळ ५.९ सेकंदात ० ते ६० किमीचा वेग पकडू शकते. शहरातील युजर्सनी या बाईककडून ७१ किमीपर्यंत मायलेज मिळत असल्याचे नोंदवले आहे. याची एक्स-शोरूम किंमत ८४,००० ते १.०३ लाख रुपयांच्या दरम्यान आहे.
२. Honda SP 125
होंडाची ही बाईक आपल्या रिफाईन्ड इंजिन आणि ‘सायलेंट स्टार्ट’ फिचरसाठी ओळखली जाते. याचे मायलेज ६३ ते ६५ किमी प्रति लिटर असून यात पीजीएम-एफआय फ्युएल इंजेक्शन तंत्रज्ञान वापरले आहे. ११ लिटरची इंधन टाकी आणि ५-स्पीड गिअरबॉक्समुळे लांबच्या प्रवासासाठी ही बाईक सोयीस्कर आहे. याची किंमत ८६,००० ते ९१,००० रुपये आहे.
३. Hero Xtreme 125R
जर तुम्हाला १२५cc मध्ये एग्रेसिव्ह आणि स्पोर्टी लूक हवा असेल, तर ही बाईक तुमच्यासाठी आहे. ६६ किमीचे मायलेज देणारी ही बाईक पूर्णपणे डिजिटल क्लस्टर आणि एलईडी लाईट्सने सुसज्ज आहे. हायवेवर ही बाईक ६०-६१ किमीचे स्थिर मायलेज देते. याची किंमत ८९,००० ते १ लाख रुपयांपर्यंत आहे.
४. Hero Glamour X 125
ही बाईक आधुनिक फीचर्स आणि मायलेजचे उत्तम कॉम्बिनेशन आहे. यात इको, रोड आणि पॉवर असे तीन रायडिंग मोड्स दिले आहेत, जे तुमच्या गरजेनुसार कामगिरी बदलतात. ६५ किमी मायलेज देणाऱ्या या बाईकमध्ये रिअल-टाइम मायलेज इंडिकेटर आणि ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी देखील मिळते. याची एक्स-शोरूम किंमत ८५,००० ते ९२,००० रुपये आहे.
५. Hero Super Splendor XTEC
कमी देखभालीत जास्त मायलेज हवं असल्यास ही बाईक आजही अव्वल आहे. याचे १२४.७cc इंजिन ६९ किमी प्रति लिटर इतका जबरदस्त मायलेज देऊ शकते. १० लिटरच्या टाकीसह ही बाईक एका वेळी ७०० किमीपर्यंतचा प्रवास करू शकते. यात डिजिटल मीटर आणि आय३एस तंत्रज्ञान देण्यात आले आहे. याची किंमत ८५,००० ते ९५,००० रुपये आहे.










