Attack on Iran by Aramco – जगातील बड्या खासगी तेल शुद्धीकरण कंपन्यांपैकी एक असलेल्या सौदी अरेबियातील अरामको रिफायनरी या कंपनीवर काल इराणने मोठा ड्रोन हल्ला केला. या ड्रोन हल्ल्यानंतर कंपनीत आग लागल्याने तेल पुरवठा ठप्प झाला आहे. याचा परिणाम अनेक देशांवर होणार आहे.
इराणचे तेलावरील नियंत्रण कमी करण्यासाठी अमेरिकेने इस्त्रायलला मदत करीत या इराण विरोधातील युद्धात उडी घेतली आहे. याचा वचपा काढण्यासाठीच इराणने सौदी अरेबियातील अरामको या सर्वात मोठ्या तेल कंपनीवर हल्ला केला. आज या हल्ल्याची हवाई छायाचित्रेही त्यांनी जारी केली. ही छायाचित्रे पाहता हा कारखाना पूर्ण उद्ध्वस्त झाल्याचे दिसते. मात्र काही वेळातच आग आटोक्यात आणून परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात आले, असे अरामको कंपनीच्या वतीने सांगण्यात येत आहे.
हीच अरामको कंपनी कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू किंवा सोयगाव येथे तेल शुद्धीकरण प्रकल्प उभारणार आहे. हा प्रकल्प पहिल्यांदा नाणार येथे उभारण्यात येणार होता. मात्र स्थानिकांच्या विरोधामुळे हा प्रकल्प नाणारमधून हलवण्यात आला. त्यानंतर तो बारसूला हासविण्याचा निर्णय झाला. मात्र तिथेही त्याला कडाडून विरोध झाला. या प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहित
करण्याच्या हालचाली सुरू झाल्या तेव्हा स्थानिकांनी उग्र आंदोलन केले. उबाठा या आंदोलकांच्या पाठिंब्याला उभी ठाकली तेव्हा उध्दव ठाकरे यांनी या प्रकल्पाला मंजुरी दिली होती असे फडणवीस सरकारने जाहीर केले . त्यामुळे अधिकच खळबळ उडाली. तरीही आम्ही जनमताच्या पाठीशी आहोत अशी भूमिका घेत उबाठाने आपली बाजू सावरली . अखेर फडणवीस सरकारने या प्रकल्पाचे काम काही काळ स्थगित केले . अलिकडेच आरामको या योजनेतून बाहेर पडली असल्याच्या बातमी येत होती.
हे देखील वाचा –
इराणसोबतचे युद्ध किती दिवस चालणार? डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे विधान
भारत पुन्हा युद्धाची तयारी करत आहे’; पाकिस्तानच्या राष्ट्रपतींचे खळबळजनक विधान
कुवेतमध्ये विशाखा सुभेदार यांचा मुलगा अडकला; सरकारकडे मदतीचीची हाक











