Home / देश-विदेश / Donald trump : ट्रम्पनी उद्या व्हाईट हाऊसमध्ये शस्त्रास्त्र कंत्राटदारांना बोलावले

Donald trump : ट्रम्पनी उद्या व्हाईट हाऊसमध्ये शस्त्रास्त्र कंत्राटदारांना बोलावले

Donald trump : इराण – इस्त्रायल युद्धामुळे मध्यपूर्वेत संघर्ष वाढला आहे. इराणने अमेरिकेचे आखातातील लष्करी व हवाई तळउद्ध्वस्त केल्याने...

By: Team Navakal
Social + WhatsApp CTA

 Donald trump : इराण – इस्त्रायल युद्धामुळे मध्यपूर्वेत संघर्ष वाढला आहे. इराणने अमेरिकेचे आखातातील लष्करी व हवाई तळ
उद्ध्वस्त केल्याने अमेरिकेच्या शस्त्रसाठ्यात मोठी घट झाल्याची माहिती आहे. शस्त्रास्त्र निर्मितीत वेग आणावा हे सांगण्यासाठी व्हाईट हाऊसने प्रमुख संरक्षण कंत्राटदारांसोबत शुक्रवारी  6 फेब्रुवारीला आपत्कालीन बैठक आयोजित केली आहे.
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने देशातील आघाडीच्या संरक्षण उत्पादन कंपन्यांना उत्पादन क्षमता तातडीने वाढवण्याचे संकेत दिले आहेत. या बैठकीत लॉकहिड मार्टिन, आरटीएक्स कॉर्पोरेशन  यांसारख्या प्रमुख शस्त्रनिर्मिती कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सहभागी होण्यासाठी निमंत्रण देण्यात आले आहे. पेंटागॉनकडून संरक्षण कंत्राटदारांवर भागधारकांना नफा वाटप करण्याऐवजी उत्पादन वाढीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी दबाव टाकला जात  आहे.


कमी कामगिरी करणाऱ्या कंपन्यांची स्वतंत्र यादी जाहीर करून त्यांना सुधारणा आराखडा सादर करण्यासाठी 15 दिवसांची मुदत दिली जाण्याची शक्यता आहे. आवश्यक सुधारणा न झाल्यास करार रद्द करण्याचाही इशारा देण्यात आला आहे. अमेरिकेचे नेतृत्व सुमारे 50 अब्ज डॉलरच्या पूरक संरक्षण बजेट प्रस्तावावर काम करत असून, या निधीतून मध्यपूर्व आणि इतर संघर्षांमध्ये वापरलेल्या शस्त्रास्त्रांची भरपाई केली जाणार आहे. मात्र अमेरिकेत ट्रम्प यांच्या या युद्धाच्या निर्णयाला विरोध होत आहे. अमेरिकी काँग्रेसमध्ये ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाचे वर्चस्व असले तरी विरोधी ड्रेमोक्रेटिक पक्षांना युद्धाला विरोध करणारा प्रस्ताव काँग्रेसमध्ये मांडण्याची तयारी केली आहे.


2022 मध्ये रशिया- युक्रेन युद्ध  सुरू झाल्यानंतर अमेरिकेने युक्रेनला मोठ्या प्रमाणावर तोफखाना, क्षेपणास्त्रे आणि संरक्षण प्रणाली पुरवल्या. त्यानंतर गाझा पट्टीमधील संघर्षात इस्रायलला दिलेल्या मदतीमुळेही अमेरिकेच्या शस्त्रसाठ्यावर परिणाम झाला. आता इराणविरोधातील कारवायांमुळे लांब पल्ल्याच्या अत्याधुनिक क्षेपणास्त्रांचा वापर वाढल्याने साठा पुन्हा वाढवण्याची गरज निर्माण झाली आहे. अमेरिकेने अलीकडील कारवाईदरम्यान टॉमहॉक क्रूझ क्षेपणास्त्र आणि एकेरी हल्ला करणाऱ्या ड्रोनचा मोठ्या प्रमाणात वापर केला. या शस्त्रांची निर्मिती प्रक्रिया वेळखाऊ आणि खर्चिक असल्याने त्याचे उत्पादन वाढवणे हे ट्रम्प  प्रशासनासमोर मोठे आव्हान ठरत आहे. तज्ज्ञांच्या मते, अमेरिकेच्या शस्त्रसाठ्यातील घट ही केवळ लष्करी नव्हे तर भू-राजकीय संकेत देणारी बाब आहे.

एकाच वेळी अनेक आघाड्यांवर सक्रिय राहण्याची अमेरिकेची क्षमता टिकवण्यासाठी संरक्षण उत्पादन साखळी मजबूत करणे अपरिहार्य झाले आहे.दरम्यान आज युध्दाच्या पाचव्या दिवशीही इस्रायल आणि इराणचे एकमेकांवर ड्रोन हल्ले सुरूच राहिले, अमेरिकेने लेबनॉनमधून आज आघाडी घेतली. दुसरीकडे स्पेनने अमेरिकेला मदत करण्यास नकार दिला असला तरी अमेरिकेला पाठिंबा देत आज ग्रीस, फ्रान्स आणि जर्मनीने युध्दात उतरत आपले नौदल सज्ज केले, ब्रिटनने सायप्रस येथील फुजाईराह किनाऱ्यावरील आपल्या  लष्करी तळाचे संरक्षण करण्यासाठी एचएमएस ड्रॅगन हे लढाऊ विमान पाठवले असून ते एक आठवड्यात भूमध्य समुद्रात पोहोचेल. इस्त्रायलने आज इराणला धमकी दिली की तुम्ही जो नवा नेता निवडाल त्याचाही आम्ही खात्मा करू.इस्रायल, अमेरिका युद्ध थांबवण्याच्या मनःस्थितीत नसताना इराणही अजून सशक्तपणे हल्ले करीत आहे. आज इराणने दुबईतील अमेरिकी दुतावासावर हल्ला केला, बगदादच्या अमेरिकी दुतावासावर क्षेपणास्त्र डागले, बहारीन, कुवैत, सौदीवर हल्ले सुरूच ठेवले, कतारने  हल्ल्यामुळे हवाई मार्ग बंद केला.

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या