Home / लेख / Apple ने लाँच केला आतापर्यंतचा सर्वात स्वस्त ‘MacBook’; किंमत आणि फीचर्स पाहून विंडोज लॅपटॉप विसरून जाल

Apple ने लाँच केला आतापर्यंतचा सर्वात स्वस्त ‘MacBook’; किंमत आणि फीचर्स पाहून विंडोज लॅपटॉप विसरून जाल

Apple MacBook Neo Launch: गेल्या अनेक वर्षांपासून स्वस्त लॅपटॉपच्या बाजारपेठेत विंडोज आणि क्रोमबुकचे वर्चस्व होते, पण आता ॲपलने या क्षेत्रात...

By: Team Navakal
Apple MacBook Neo
Social + WhatsApp CTA

Apple MacBook Neo Launch: गेल्या अनेक वर्षांपासून स्वस्त लॅपटॉपच्या बाजारपेठेत विंडोज आणि क्रोमबुकचे वर्चस्व होते, पण आता ॲपलने या क्षेत्रात मोठी एन्ट्री केली आहे. ॲपलने अधिकृतपणे आपले नवीन ‘मॅकबुक निओ’ (MacBook Neo) लाँच केले असून, हे विशेषतः बजेटचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी डिझाइन करण्यात आले आहे. आजवर मॅकबुक एअर हा ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप मानला जात होता, पण आता मॅकबुक निओने ही जागा घेतली आहे.

Apple MacBook Neo : किंमत आणि उपलब्धता

भारतात मॅकबुक निओच्या 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 69,900 रुपये ठेवण्यात आली आहे, तर 512GB व्हेरिएंटसाठी 79,900 रुपये मोजावे लागतील. ॲपलच्या वेबसाईटवर याची प्री-ऑर्डर सुरू झाली असून, 11 मार्च 2026 पासून हा लॅपटॉप खरेदीसाठी उपलब्ध होईल. तुलनेसाठी सांगायचे तर, नवीन मॅकबुक एअरची किंमत 1,19,900 रुपयांपासून सुरू होते.

Apple MacBook Neo : मॅकबुक निओचे खास फीचर्स

कमी किंमत असूनही ॲपलने याच्या लूक आणि प्रीमियम अनुभवाशी कोणतीही तडजोड केलेली नाही. याचे महत्त्वाचे फीचर्स खालीलप्रमाणे आहेत:

  • प्रोसेसर: यामध्ये मॅकबुक एअरप्रमाणे एम-सीरीज चिप नसून, आयफोन 16 प्रो मध्ये असलेली शक्तिशाली A18 Pro चिप वापरण्यात आली आहे. यात 6-कोअर सीपीयू आणि 5-कोअर जीपीयू मिळतो.
  • डिस्प्ले: यात 13 इंचाचा लिक्विड रेटिना डिस्प्ले असून 500 निट्सची ब्राइटनेस मिळते.
  • रंग: हा लॅपटॉप इंडिगो, सायट्रस, ब्लश आणि क्लासिक सिल्व्हर अशा आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहे.
  • बॅटरी: एकदा चार्ज केल्यावर हा लॅपटॉप 16 तासांपर्यंत व्हिडिओ स्ट्रीमिंग देऊ शकतो, असा कंपनीचा दावा आहे. बॉक्समध्ये 20W चा चार्जर मिळेल.
  • डिझाइन: हा लॅपटॉप पूर्णपणे रिसायकल केलेल्या ॲल्युमिनियमपासून बनवलेला असून यात फॅनलेस डिझाइन आहे, ज्यामुळे तो अत्यंत शांत चालतो.

खर्चात कपात करण्यासाठी केलेले बदल

किंमत कमी ठेवण्यासाठी ॲपलने काही जाणीवपूर्वक बदल केले आहेत. यामध्ये बॅकलिट कीबोर्ड (बटणांमागील लाईट) देण्यात आलेला नाही. तसेच, मॅकसेफ चार्जिंग पोर्ट काढून केवळ दोन यूएसबी-सी पोर्ट दिले आहेत. यात एचडी कॅमेरा आणि दोन स्पीकर्स मिळतात, तर टच आयडीचा पर्याय केवळ महागड्या मॉडेलमध्ये उपलब्ध आहे.

विद्यार्थी आणि घरगुती वापरासाठी हा लॅपटॉप एक उत्तम पर्याय ठरू शकतो. विंडोज लॅपटॉप वापरणाऱ्या मोठ्या ग्राहकवर्गाला आपल्याकडे खेचण्यासाठी ॲपलने टाकलेले हे एक मोठे पाऊल मानले जात आहे.

हे देखील वाचा – US Iran Conflict : हिंदी महासागरात युद्धाचा भडका! अमेरिकने इराणची युद्धनौका उडवली; व्हिडिओ आला समोर

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
Topics:
संबंधित बातम्या