Home / लेख / Best 7 Seater Cars : मोठ्या कुटुंबासाठी स्वस्त आणि मस्त गाड्या! 6 लाखांच्या बजेटमध्ये घरी आणा 7 सीटर कार; पाहा टॉप मॉडेल्सची यादी

Best 7 Seater Cars : मोठ्या कुटुंबासाठी स्वस्त आणि मस्त गाड्या! 6 लाखांच्या बजेटमध्ये घरी आणा 7 सीटर कार; पाहा टॉप मॉडेल्सची यादी

Best 7 Seater Cars : एकेकाळी ७ जणांच्या बसण्याची सोय असलेली गाडी खरेदी करणे हे मध्यमवर्गीयांसाठी महागडे स्वप्न होते. मात्र,...

By: Team Navakal
Best 7 Seater Cars
Social + WhatsApp CTA

Best 7 Seater Cars : एकेकाळी ७ जणांच्या बसण्याची सोय असलेली गाडी खरेदी करणे हे मध्यमवर्गीयांसाठी महागडे स्वप्न होते. मात्र, आता ऑटोमोबाईल कंपन्यांनी ही कसरत सोपी केली आहे. आपल्या कुटुंबासह सहलीला जाण्यासाठी किंवा लांबच्या प्रवासासाठी आता ५.६५ लाखांपासून ७ सीटर गाड्यांचे पर्याय उपलब्ध झाले आहेत.

कमी किंमत, उत्तम मायलेज आणि प्रवाशांच्या सोयीसाठी डिझाइन केलेले प्रशस्त इंटिरिअर ही या गाड्यांची खास वैशिष्ट्ये आहेत. चला तर मग, तुमच्या बजेटमध्ये बसणाऱ्या टॉप ५ गाड्यांवर एक नजर टाकूया.

१. निसान ग्रॅविटे (Nissan Gravite)

निसानची ही गाडी सध्या भारतातील सर्वात परवडणाऱ्या ७ सीटर कारपैकी एक म्हणून ओळखली जाते. ४ मीटरपेक्षा कमी लांबी असूनही यात ७ प्रवाशांसाठी जागा अतिशय हुशारीने तयार करण्यात आली आहे. रेनोच्या तंत्रज्ञानावर आधारित असलेली ही कार ५.६५ लाख रुपयांपासून (एक्स-शोरूम) सुरू होते.

२. रेनो ट्रायबर (Renault Triber)

कमी किमतीत ‘स्मार्ट’ गाडी हवी असेल तर रेनो ट्रायबरला तोड नाही. या गाडीचे वैशिष्ट्य म्हणजे यातील मधल्या रांगेतील सीट तुम्ही तुमच्या गरजेनुसार मागे-पुढे सरकवू शकता. ५.७६ लाख रुपयांपासून सुरू होणारी ही गाडी ८.६ लाख रुपयांपर्यंत (एक्स-शोरूम) उपलब्ध आहे.

३. महिंद्रा बोलेरो (Mahindra Bolero)

खराब रस्ते आणि मजबूत बांधणीसाठी महिंद्रा बोलेरो ही आजही अनेक भारतीयांची पहिली पसंती आहे. आता या गाडीला अधिक आधुनिक लूक देण्यात आला असून आतील सीट अधिक आरामदायी केल्या आहेत. ७.९९ लाख रुपयांपासून (एक्स-शोरूम) सुरू होणारी ही गाडी ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागांत लोकप्रिय आहे.

४. मारुती सुझुकी एर्टिगा (Maruti Suzuki Ertiga)

जर तुम्हाला आलिशान अनुभव आणि विश्वासार्ह इंजिन हवे असेल, तर एर्टिगा हा सर्वोत्तम पर्याय आहे. यात १.५ लिटरचे पेट्रोल इंजिन मिळते, जे अतिशय शांत आणि दमदार चालते. मध्यमवर्गीय कुटुंबांमध्ये ही सर्वाधिक विकली जाणारी ७ सीटर कार असून तिची किंमत ८.८० लाख ते १२.९४ लाख रुपयांच्या दरम्यान आहे.

५. महिंद्रा बोलेरो निओ (Mahindra Bolero Neo)

ज्यांना जुन्या बोलेरोची मजबुती आणि नवीन काळातील डिझाइन हवे आहे, त्यांच्यासाठी बोलेरो निओ तयार करण्यात आली आहे. लांबच्या प्रवासात चालकाला आराम मिळावा यासाठी यात खास आर्मरेस्ट देण्यात आले आहेत. याची सुरुवातीची किंमत ८.६९ लाख रुपये असून टॉप मॉडेल १०.९४ लाख रुपयांपर्यंत जाते.

हे देखील वाचा – Finn Allen Record: ‘युनिव्हर्स बॉस’चा विक्रम मोडीत! फिन्न ॲलनचे ऐतिहासिक वादळ; अवघ्या 33 चेंडूत ठोकले सर्वात वेगवान शतक

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
Topics:
संबंधित बातम्या