Home / महाराष्ट्र / Maharashtra Budget 2026: जुनी गाडी चालवताय? तर आता भरावा लागणार दुप्पट ‘ग्रीन टॅक्स’

Maharashtra Budget 2026: जुनी गाडी चालवताय? तर आता भरावा लागणार दुप्पट ‘ग्रीन टॅक्स’

Maharashtra Budget 2026 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्याचा २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये प्रदूषणावर नियंत्रण...

By: Team Navakal
Maharashtra Budget 2026
Social + WhatsApp CTA

Maharashtra Budget 2026 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्याचा २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि ऑटोमोबाईल क्षेत्राला चालना देण्यासाठी सरकारने महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. राज्यातील वाढते प्रदूषण लक्षात घेता, जुन्या आणि घातक धूर सोडणाऱ्या वाहनांवर आता कडक निर्बंध लादण्यात आले आहेत.

जुन्या गाड्यांवर वाढला कर

प्रदूषण कमी करण्याच्या उद्देशाने सरकारने जुन्या वाहनांवरील ‘ग्रीन टॅक्स’ (Green Tax) वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या वाहनांचे वय १५ ते २० वर्षांच्या दरम्यान आहे, अशा जुन्या गाड्यांच्या मालकांना आता दुप्पट ग्रीन टॅक्स भरावा लागणार आहे. विशेषतः बीएस-४ (BS-4) किंवा त्यापेक्षा जुन्या उत्सर्जन मानकांचे पालन करणाऱ्या खासगी वाहनांना या टॅक्सच्या कक्षेत आणण्यात आले आहे. त्यामुळे जुनी गाडी चालवणे आता खिशाला कात्री लावणारे ठरेल.

गाडी ‘स्क्रॅप’ करा, सवलत मिळवा!

सरकारने केवळ दंड किंवा कर वाढवण्यावर भर न देता, वाहनधारकांना नवीन गाडी घेण्यासाठी प्रोत्साहनही दिले आहे:

  • बीएस-४ गाड्या: जर तुम्ही तुमची बीएस-४ किंवा त्यावरील जुनी गाडी अधिकृत स्क्रॅप केंद्रावर जमा करून नवीन वाहन खरेदी केले, तर तुम्हाला मोटार वाहन करात १६% पर्यंत सवलत मिळेल.
  • बीएस-३ गाड्या: जर तुमच्याकडे बीएस-३ किंवा त्यापेक्षा जुनी गाडी असेल आणि ती स्क्रॅप करून नवीन गाडी घेणार असाल, तर तुम्हाला करात ३०% पर्यंत मोठी सवलत देण्यात येईल.

नागरिकांसाठी फायद्याची ‘डील’

मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले की, जुन्या गाड्या प्रदूषण पसरवण्यासोबतच रस्त्यावरील सुरक्षेसाठीही धोकादायक ठरत आहेत. नवीन स्क्रॅप धोरणामुळे ग्राहकांना एकीकडे सरकारी करात सवलत मिळेल, तर दुसरीकडे वाहन कंपन्यांकडूनही अतिरिक्त ऑफर मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे जुनी गाडी भंगारात काढून नवीन गाडी घेणे हे आता ग्राहकांसाठी आर्थिकदृष्ट्या फायद्याचे ठरेल.

दिल्लीच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने घेतलेला हा निर्णय पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Web Title:
For more updates: stay tuned with Navakal
संबंधित बातम्या