Realme C83 5G Launch: रिअलमीने आपल्या सी सिरीजमध्ये ‘Realme C83 5G’ हा नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. हा फोन प्रामुख्याने ज्यांना बॅटरी बॅकअप आणि स्मूथ डिस्प्ले हवा आहे, त्यांच्यासाठी डिझाइन केला आहे.
महत्त्वाचे फीचर्स:
- डिस्प्ले: ६.८ इंचाचा एचडी प्लस आयपीएस एलसीडी डिस्प्ले, १४४ Hz रिफ्रेश रेट आणि ९०० निट्स पीक ब्राइटनेस.
- प्रोसेसर: मीडियाटेक डायमेन्सिटी ६३०० ऑक्टा कोर प्रोसेसर आणि माली जी५७ एमसी२ जीपीयू.
- बॅटरी: ७००० mAh ची मोठी बॅटरी, १५ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह.
- चार्जिंग फीचर्स: बायपास चार्जिंग आणि रिव्हर्स वायर्ड चार्जिंग सुविधा.
- कॅमेरा (मागील): १३ मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा, एलईडी फ्लॅशसह.
- कॅमेरा (पुढील): ५ मेगापिक्सेलचा सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंग कॅमेरा.
- स्टोरेज आणि रॅम: ४ GB/६ GB एलपीडीडीआर४एक्स रॅम आणि ६४ GB/१२८ GB ईएमएमसी ५.१ स्टोरेज.
- स्टोरेज विस्तार: मायक्रो एसडी कार्डद्वारे २ TB पर्यंत वाढवता येण्याजोगी मेमरी.
- सॉफ्टवेअर: अँड्रॉइड १६ वर आधारित रिअलमी युआय ७.०.
- टिकाऊपणा: आयपी६४ डस्ट आणि स्प्लॅश रेसिस्टन्स, आर्मरशेल प्रोटेक्शन आणि मिलिटरी ग्रेड शॉक रेसिस्टन्स सर्टिफिकेशन.
- इतर सुविधा: एआय आउटडोअर मोड, साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर, ३.५ मिमी ऑडिओ जॅक आणि स्टिरिओ स्पीकर.
- कनेक्टिव्हिटी: ५ जी, ड्युअल ४ जी व्होल्ट, वाय-फाय, ब्लूटूथ ५.३, जीपीएस आणि युएसबी टाइप सी पोर्ट.
किंमत आणि मॉडेल्स:
- ४ GB + ६४ GB: १३,४९९ रुपये.
- ४ GB + १२८ GB: १४,४९९ रुपये.
- ६ GB + १२८ GB: १७,४९९ रुपये.
हा फोन फ्लिपकार्ट, अधिकृत वेबसाईट आणि ऑफलाइन स्टोअर्सवर उपलब्ध आहे. ग्राहकांना ६ महिन्यांपर्यंत नो कॉस्ट ईएमआयची ऑफरही दिली जात आहे.












