Home / क्रीडा / ICC Team of the Tournament: वर्ल्डकपची सर्वोत्कृष्ट ‘ड्रीम टीम’ जाहीर! भारतीय खेळाडूंचा दबदबा; पाहा कोणाकोणाला मिळाले स्थान?

ICC Team of the Tournament: वर्ल्डकपची सर्वोत्कृष्ट ‘ड्रीम टीम’ जाहीर! भारतीय खेळाडूंचा दबदबा; पाहा कोणाकोणाला मिळाले स्थान?

ICC Team of the Tournament: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर न्यूझीलंडचा धुव्वा उडवत भारताने टी-२० विश्वचषक २०२६ वर आपले नाव कोरले....

By: Team Navakal
ICC Team of the Tournament
Social + WhatsApp CTA

ICC Team of the Tournament: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर न्यूझीलंडचा धुव्वा उडवत भारताने टी-२० विश्वचषक २०२६ वर आपले नाव कोरले. या ऐतिहासिक विजयानंतर आता ‘आयसीसी’ने या स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या ११ खेळाडूंची ‘टीम ऑफ द टूर्नामेंट’ जाहीर केली आहे.

इयान बिशप, इऑन मॉर्गन आणि नताली जर्मनोस यांसारख्या दिग्गज क्रिकेटपटूंच्या निवड समितीने या खेळाडूंची निवड केली आहे. या लिस्टमध्ये 4 भारतीय खेळाडूंचा समावेश आहे.

आयसीसीची सर्वोत्कृष्ट टी-२० टीम:

  1. साहिबजादा फरहान (पाकिस्तान): ७ सामन्यांत ३८३ धावांच्या विक्रमी कामगिरीसह सलामीवीर म्हणून निवड.
  2. संजू सॅमसन (भारत – यष्टिरक्षक): ५ सामन्यांत ३२१ धावा करत स्पर्धेचा ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’ ठरला.
  3. ईशान किशन (भारत): ९ सामन्यांत १९३ च्या स्ट्राईक रेटने ३१७ धावा करून आपली आक्रमकता दाखवली.
  4. एडन मार्करम (दक्षिण आफ्रिका – कर्णधार): ८ सामन्यांत २८६ धावांसह संघाचे उत्कृष्ट नेतृत्व केले.
  5. हार्दिक पंड्या (भारत): अष्टपैलू कामगिरी करत ९ बळी आणि २१७ धावांचे योगदान दिले.
  6. विल जॅक्स (इंग्लंड): उत्कृष्ट फिनिशर म्हणून ओळख निर्माण करत ४ वेळा ‘प्लेअर ऑफ द मॅच’चा किताब पटकावला.
  7. जेसन होल्डर (वेस्ट इंडीज): वेगवान गोलंदाजी आणि तळाच्या फळीतील फलंदाजीने प्रभावित केले.
  8. जसप्रीत बुमराह (भारत): स्पर्धेतील सर्वाधिक १४ बळी घेत गोलंदाजीचे नेतृत्व केले. फायनलमध्ये त्याने ४ बळी टिपत ‘मॅन ऑफ द मॅच’चा मान मिळवला.
  9. लुंगी एनगिडी (दक्षिण आफ्रिका): सातत्यपूर्ण गोलंदाजी करत १२ बळी मिळवले.
  10. आदिल रशीद (इंग्लंड): फिरकी गोलंदाज म्हणून १३ बळींसह संघात स्थान मिळवले.
  11. ब्लेसिंग मुजरबानी (झिम्बाब्वे): ६ सामन्यांत १३ बळी घेत झिम्बाब्वेच्या यशस्वी प्रवासात मोलाची भूमिका बजावली.
  12. शॅडली व्हॅन शालविक (१२ वा खेळाडू – अमेरिका): ४ सामन्यांत १३ बळी घेत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

भारतीय खेळाडूंचे वर्चस्व

या टीममध्ये भारताचे ४ खेळाडू (संजू सॅमसन, ईशान किशन, हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमराह) स्थान मिळवून आघाडीवर आहेत. विशेषतः जसप्रीत बुमराहची अचूक गोलंदाजी आणि संजू सॅमसनची फलंदाजी भारताच्या विजयाचे मुख्य सूत्र ठरली. पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानने एकाच विश्वचषकात २ शतके ठोकण्याचा पराक्रम करत या यादीत स्थान मिळवले आहे, तर झिम्बाब्वेच्या मुजरबानीने गोलंदाजीतून सर्वांना चकित केले.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या