Home / महाराष्ट्र / Property Registration Update: घर खरेदीदारांसाठी मोठी बातमी! मार्चअखेर सुट्ट्यांच्या दिवशीही नोंदणी कार्यालये राहणार सुरू

Property Registration Update: घर खरेदीदारांसाठी मोठी बातमी! मार्चअखेर सुट्ट्यांच्या दिवशीही नोंदणी कार्यालये राहणार सुरू

Property registration offices open on holidays March : आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना असल्याने सध्या मालमत्ता खरेदी-विक्रीच्या व्यवहारांमध्ये मोठी वाढ झाली...

By: Team Navakal
Property registration offices open on holidays March
Social + WhatsApp CTA

Property registration offices open on holidays March : आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना असल्याने सध्या मालमत्ता खरेदी-विक्रीच्या व्यवहारांमध्ये मोठी वाढ झाली आहे. मार्चअखेर होणारी ही गर्दी आणि सरकारी उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.

त्यानुसार, चालू महिन्यातील सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशीही राज्यातील दुय्यम निबंधक कार्यालये सुरू ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

या तारखांना कार्यालये राहणार सुरू

मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सुट्ट्यांचा ओघ असल्याने नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील सर्व दुय्यम निबंधक आणि जिल्हा मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालये २६, २८, २९ आणि ३१ मार्च या सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशीही पूर्णवेळ कार्यरत राहणार आहेत. कामाचा वाढता व्याप पाहता, सुट्टीच्या दिवशीही दस्त नोंदणीची प्रक्रिया सुरळीत पार पडणार आहे.

गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाचा निर्णय

दरवर्षी एप्रिल महिन्यात ‘रेडी रेकनर’चे दर वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे अनेक नागरिक ३१ मार्चपूर्वी आपले मालमत्ता व्यवहार पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. जर सुट्ट्यांच्या दिवशी कार्यालये बंद राहिली, तर कामकाजाच्या दिवशी प्रचंड गर्दी होऊन यंत्रणेवर ताण येऊ शकतो. हीच शक्यता लक्षात घेऊन नोंदणी उपमहानिरीक्षक उदयराज चव्हाण यांनी चारही सुट्ट्यांच्या दिवशी कार्यालये उघडी ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांना सूचना

केवळ दुय्यम निबंधक कार्यालयेच नाही, तर जिल्हा निबंधक आणि मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांची पर्यवेक्षकीय कार्यालये देखील या काळात सुरू राहतील. ज्या कार्यालयांना शनिवार किंवा रविवार व्यतिरिक्त इतर दिवशी साप्ताहिक सुट्टी असते, त्यांनाही मार्चअखेर किमान एक दिवस अतिरिक्त काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यामुळे प्रलंबित दस्तऐवजांची नोंदणी आणि मुद्रांक शुल्काशी संबंधित कामे वेळेत पूर्ण होण्यास मदत होणार आहे.

हे देखील वाचा – US Strikes Iran: अमेरिकेचा इराणवर भीषण हल्ला! 2,200 किलोच्या बॉम्बने इराणचे क्षेपणास्त्र तळ उडवले

Web Title:
संबंधित बातम्या