Home / लेख / आता Grok AI करणार तुमचे काम! एका क्लिकवर दररोज मिळवा ऑटोमॅटिक रिसर्च रिपोर्ट ; पाहा कसे काम करते हे फीचर

आता Grok AI करणार तुमचे काम! एका क्लिकवर दररोज मिळवा ऑटोमॅटिक रिसर्च रिपोर्ट ; पाहा कसे काम करते हे फीचर

Grok AI Tasks: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) वापरणाऱ्यांसाठी एक अत्यंत उपयुक्त फिचर समोर आले आहे. इलॉन मस्क यांच्या...

By: Team Navakal
Grok AI Tasks
Social + WhatsApp CTA

Grok AI Tasks: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) वापरणाऱ्यांसाठी एक अत्यंत उपयुक्त फिचर समोर आले आहे. इलॉन मस्क यांच्या Grok AI मधील ‘टास्क’ या फिचरचा वापर करून तुम्ही आता दररोजचा रिसर्च रिपोर्ट आपोआप तयार करू शकता.

विशेष म्हणजे, ज्यांच्याकडे विनामूल्य अकाउंट आहे, असे युजर्स देखील दररोज २ ऑटोमेटेड टास्क सेट करू शकतात. यामुळे तुम्हाला हव्या असलेल्या विषयावरील ताज्या घडामोडी शोधण्यासाठी वारंवार सर्च करण्याची गरज उरणार नाही.

ग्रोक टास्क फिचर कसे सेट करावे?

जर तुम्हाला तुमच्या आवडीच्या विषयाचा (उदा. टेक्नॉलॉजी, शेअर बाजार किंवा क्रीडा) दररोजचा सारांश हवा असेल, तर खालील सोप्या स्टेप्स फॉलो करा:

  1. ग्रोक सुरू करा: तुमच्या एक्स अकाउंटने लॉग-इन करा आणि ग्रोक सेक्शनमध्ये जा. डाव्या कोपऱ्यात असलेल्या तुमच्या प्रोफाईल फोटोवर क्लिक केल्यावर तिथे तुम्हाला ‘टास्क’ हा पर्याय दिसेल.
  2. नवीन टास्क तयार करा: ‘न्यू टास्क’ वर क्लिक करा आणि तुमच्या आवडीचे एक नाव द्या. त्यानंतर तुम्हाला हा रिपोर्ट दररोज हवा आहे की आठवड्यातून एकदा, याचे वेळापत्रक निवडा.
  3. कमांड (Prompt) द्या: तिथे सर्च बॉक्समध्ये असा मेसेज लिहा – “गेल्या २४ तासांतील माझ्या क्षेत्रातील (तुमचा विषय लिहा) टॉप ट्रेंड्स शोधा. त्यातील महत्त्वाच्या ३ गोष्टींचा सारांश द्या आणि चर्चेत असलेल्या विषयांची माहिती द्या.”
  4. सेव्ह करा: एकदा का तुम्ही हा टास्क सेव्ह केला की, ग्रोक ठरलेल्या वेळेवर आपोआप सर्च करेल. याचे रिझल्ट्स तुम्हाला ईमेलद्वारे आणि तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशनच्या स्वरूपात मिळतील.

महत्त्वाची टीप

विनामूल्य अकाउंटवर तुम्हाला दररोज २ ऑटोमेटेड टास्क मिळतात. पण जर तुम्हाला अधिक टास्क हवे असतील, तर तुम्ही आठवड्याला किंवा महिन्याला १० रिसर्च टास्क शेड्यूल करू शकता. डेस्कटॉपवर याचे निकाल पाहण्यासाठी तुम्ही पुन्हा ग्रोकच्या टास्क विभागात जाऊन जुन्या रिपोर्टवर क्लिक करू शकता.

तुमच्या कामाचा व्याप कमी करण्यासाठी आणि माहितीच्या महाजालात अपडेट राहण्यासाठी हे एआय फिचर नक्कीच गेमचेंजर ठरू शकते.

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
Topics:
संबंधित बातम्या