Home / लेख / Safest Cars in India: ‘या’ आहेत देशातील सर्वात सुरक्षित कार!  क्रॅश टेस्टमध्ये मिळाले 5-स्टार रेटिंग

Safest Cars in India: ‘या’ आहेत देशातील सर्वात सुरक्षित कार!  क्रॅश टेस्टमध्ये मिळाले 5-स्टार रेटिंग

Safest Cars in India: भारतात आता कार खरेदीचे समीकरण पूर्णपणे बदलले आहे. पूर्वी केवळ मायलेज आणि फीचर्सवर भर देणारे ग्राहक...

By: Team Navakal
Safest Cars in India
Social + WhatsApp CTA

Safest Cars in India: भारतात आता कार खरेदीचे समीकरण पूर्णपणे बदलले आहे. पूर्वी केवळ मायलेज आणि फीचर्सवर भर देणारे ग्राहक आता ‘सेफ्टी रेटिंग’ला सर्वाधिक पसंती देत आहेत. रस्ते अपघातांचे प्रमाण लक्षात घेता, केंद्र सरकारने सुरू केलेल्या ‘भारत NCAP’ या यंत्रणेने अनेक गाड्यांची कसून चाचणी केली आहे.

या चाचणीत ज्या गाड्यांनी ५-स्पार (5-Star) रेटिंग मिळवले आहे, अशा सर्वोत्तम ५ गाड्यांचा आढावा आपण घेणार आहोत. विशेष म्हणजे या यादीत इलेक्ट्रिक गाड्यांनीही मोठी बाजी मारली आहे.

१. Mahindra XEV 9e

महिंद्राच्या या पहिल्या इलेक्ट्रिक एसयूव्हीने सुरक्षिततेचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. क्रॅश टेस्टमध्ये पूर्ण ३२ पैकी ३२ गुण मिळवणारी ही देशातील पहिलीच कार ठरली आहे. या गाडीच्या बेस मॉडेलमध्येच ६ एअरबॅग्स, रिअर डिस्क ब्रेक्स आणि टायर-प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम सारखी प्रगत फीचर्स मिळतात. हायवेवर वेगाने गाडी चालवताना ही गाडी प्रवाशांना पूर्ण संरक्षण देते.

२. Maruti Victoris

सुरक्षिततेच्या बाबतीत मारुतीने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. मारुतीची मिडसाईज एसयूव्ही ‘व्हिक्टोरिस’ ५-स्टार रेटिंग मिळवण्यात यशस्वी ठरली आहे. यात सर्व प्रवाशांसाठी ३-पॉइंट सीटबेल्ट, ६ एअरबॅग्स आणि ईएससी (Electronic Stability Control) ही फीचर्स स्टँडर्ड स्वरूपात उपलब्ध आहेत. मारुतीची ही गाडी आता सुरक्षिततेच्या शर्यतीत टाटा-महिंद्राच्या तोडीस तोड ठरली आहे.

३. Tata Harrier EV

टाटाची हॅरियर ईव्ही सुरक्षिततेचा एक नवा मापदंड मानली जाते. जूनमध्ये झालेल्या चाचणीत या गाडीने ५-स्टार रेटिंग मिळवून आपली मजबुती सिद्ध केली आहे. प्रवाशांच्या आणि मुलांच्या सुरक्षेसाठी यात खास चाईल्ड सीट अँकर आणि सीटबेल्ट रिमाइंडर सारखी फीचर्स देण्यात आली आहेत. ही गाडी दीर्घ प्रवासासाठी अत्यंत सुरक्षित मानली जाते.

४. Mahindra BE 6

महिंद्राच्या ‘बीई ६’ या इलेक्ट्रिक एसयूव्हीला जानेवारी २०२५ मध्ये ५-स्टार रेटिंग मिळाले आहे. या गाडीची विशेष बाब म्हणजे, हे रेटिंग केवळ टॉप मॉडेलपुरते मर्यादित नसून सर्व व्हेरिएंट्सवर लागू होते. ६ एअरबॅग्स, पार्किंग सेन्सर्स आणि रिअर कॅमेरा यांसारखी महत्त्वाची फीचर्स यात सुरुवातीपासूनच मिळतात.

५. Tata Punch EV

लहान इलेक्ट्रिक एसयूव्ही शोधणाऱ्यांसाठी टाटा पंच ईव्ही हा सर्वात सुरक्षित पर्याय आहे. मे २०२४ मध्ये या गाडीने ५-स्टार रेटिंग पटकावले होते. ६ एअरबॅग्स, हिल-होल्ड कंट्रोल आणि चाईल्ड सीट एंकर्समुळे ही गाडी लहान मुलांसह प्रवास करणाऱ्या कुटुंबांसाठी अतिशय योग्य आहे.

हे देखील वाचा – Best SUVs For Long Drive : लांबच्या ट्रिपसाठी ‘या’ आहेत देशातील सर्वोत्तम 5 SUV, फीचर्स खूपच जबरदस्त; पाहा किंमत

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
Topics:
संबंधित बातम्या