Home / महाराष्ट्र / Ashok Kharat : अध्यात्म आणि भोंदूगिरीचा अघोरी चेहरा; कडवट पाणी, गुंगी आणि भयंकर प्रकार- महिलांच्या शोषणाचे धक्कादायक वास्तव उघड

Ashok Kharat : अध्यात्म आणि भोंदूगिरीचा अघोरी चेहरा; कडवट पाणी, गुंगी आणि भयंकर प्रकार- महिलांच्या शोषणाचे धक्कादायक वास्तव उघड

Ashok Kharat : स्वतःला ‘कॅप्टन’ म्हणवून घेणाऱ्या आणि अंकशास्त्राच्या (Numerology) बुरख्याखाली महिलांना आपल्या जाळ्यात ओढणाऱ्या अशोककुमार एकनाथ खरात उर्फ कॅप्टन...

By: Team Navakal
Ashok Kharat
Social + WhatsApp CTA

Ashok Kharat : स्वतःला ‘कॅप्टन’ म्हणवून घेणाऱ्या आणि अंकशास्त्राच्या (Numerology) बुरख्याखाली महिलांना आपल्या जाळ्यात ओढणाऱ्या अशोककुमार एकनाथ खरात उर्फ कॅप्टन खरात याच्या पाशवी कृत्यांमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. एका पीडित महिलेने दाखवलेल्या अचाट धैर्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेला हा भोंदूगिरीचा आणि अत्याचाराचा काळा बाजार अखेर प्रकाशात आला आहे. नाशिक पोलिसांनी बुधवारी (१८ मार्च) खरातला अटक केली असून, न्यायालयाने त्याला २४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

दैवी शक्तीचा बनाव आणि विश्वासाचा घात-
नाशिकमधील कॅनडा कॉर्नर परिसरातील ‘ओकस प्रॉपर्टीज’ या कार्यालयातून खरात आपले काळे कारनामे चालवत होता. सिडको परिसरातील एका २८ वर्षीय तरुणीचे लग्न जुळत नसल्याने, तिच्या नातेवाईकांनी २०१९ मध्ये खरातची भेट घेतली होती. यावेळी खरातने आपल्याकडे ‘दैवी शक्ती’ असल्याचे सांगून मंत्र-तंत्राच्या साहाय्याने सर्व समस्या निवारण करण्याचा बनाव रचला. लग्नातील अडथळे दूर करण्यासाठी त्याने पीडितेला विशिष्ट ‘रत्न’ (खडा) वापरण्याचा सल्ला दिला. योगायोगाने पीडितेने तो खडा काढल्यानंतर तिचे ठरलेले लग्न मोडले, ज्याचा फायदा घेत खरातने पीडितेच्या मनात भीतीचे रान पेरले. “खडा काढल्यामुळेच संकट आले” असे भासवून त्याने पुन्हा विधी करण्यासाठी पीडितेकडून मोठी रक्कम उकळली.

गुंगीचे औषध देऊन वारंवार अत्याचार-
तक्रारीनुसार, खरातने पीडितेवर केवळ आर्थिकच नव्हे, तर भीषण शारीरिक आणि मानसिक अत्याचार केले. २०२२ मध्ये त्याने प्रसादाच्या नावाखाली पीडितेला गुंगी आणणारे पेय दिले आणि तिच्या असहायतेचा फायदा घेत तिच्यावर बलात्कार केला. ही नराधम कृत्ये येथेच थांबली नाहीत; २०२३ मध्ये पीडितेच्या पतीला चेंबरबाहेर बसवून त्याने पुन्हा अत्याचार केला. “विधी न केल्यास पतीचा जीव जाईल” किंवा “चारित्र्यहनन करून आयुष्य उद्ध्वस्त करेल” अशा धमक्या देऊन खरातने नोव्हेंबर २०२२ ते डिसेंबर २०२५ या कालावधीत पीडितेचे सतत लैंगिक शोषण केले.

पाशवी कृत्ये आणि डिजिटल पुराव्यांचा साठा-
१५ मार्च २०२६ रोजी पीडितेच्या नातेवाईकांना खरातच्या भोंदूगिरीची कुणकुण लागली. त्यांनी विश्वासात घेतल्यानंतर पीडितेने आपल्यावर झालेला अन्याय कथन केला. १७ मार्च रोजी सरकारवाडा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केल्यानंतर, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेने तातडीने कारवाई केली. खरातच्या ‘तृप्तबाला’ या बंगल्यावर छापा टाकला असता, पोलिसांच्या हाती धक्कादायक डिजिटल पुरावे लागले आहेत. जप्त केलेल्या पेनड्राईव्हमध्ये अनेक आक्षेपार्ह व्हिडिओ आढळले असून, त्यातून अनेक बड्या महिला आणि सेलिब्रिटींच्या शोषणाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे.

उच्चभ्रू वर्तुळातील वावर आणि ‘अंनिस’चे दावे-
अशोक खरात याचे जाळे केवळ नाशिकपुरते मर्यादित नसून परराज्यातही पसरलेले आहे. त्याच्या ‘दरबारात’ अनेक राजकीय नेते, उद्योजक आणि उच्चशिक्षित महिलांची ये-जा होती. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (अंनिस) केलेल्या दाव्यानुसार, अनेक व्यावसायिक महिला आणि राजकीय पदाधिकारी देखील त्याच्या या जाळ्यात अडकले असण्याची दाट शक्यता आहे.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या