Aadhaar Download on WhatsApp: आता सरकारी कामांसाठी किंवा ओळखपत्रासाठी आधार कार्डची हार्ड कॉपी मिळवण्यासाठी कोणत्याही वेबसाईटवर जाण्याची किंवा पोस्टाची वाट पाहण्याची गरज उरलेली नाही. २०२६ मध्ये भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण आणि मायगव यांनी तुमची डिजिटल ओळख मिळवणे अत्यंत सोपे केले आहे.
आता तुम्ही बँक केवायसी, नवीन सिम खरेदी किंवा पासपोर्टसाठी तुमचे ‘ई-आधार’ थेट व्हाट्सअॅपच्या माध्यमातून मिळवू शकता.
व्हाट्सअॅपवरून आधार डाऊनलोड करण्यासाठी आवश्यक गोष्टी
ही सुविधा वापरण्यापूर्वी तुमच्याकडे खालील गोष्टी असणे आवश्यक आहे:
- आधार कार्डशी लिंक असलेला सक्रिय मोबाईल नंबर.
- डिजीलॉकरवर तुमचे खाते असणे गरजेचे आहे.
- तुमचा 12 अंकी आधार नंबर.
७ सोप्या स्टेप्समध्ये डाऊनलोड करा आधार
स्टेप 1: नंबर सेव्ह करा सर्वात आधी तुमच्या फोनमध्ये मायगव हेल्पडेस्कचा अधिकृत नंबर +91-90131-51515 सेव्ह करा.
स्टेप 2: चॅट सुरू करा तुमचे व्हाट्सअॅप उघडा आणि या नंबरवर “Hi”, “Namaste” किंवा “Aadhaar” असा मेसेज पाठवा.
स्टेप 3: डिजीलॉकर सर्व्हिस निवडा चॅट बॉटच्या उत्तरामध्ये तुम्हाला काही पर्याय दिसतील, त्यातील “DigiLocker Services” हा पर्याय निवडा.
स्टेप 4: आधार नंबर टाका आता तुमचा 12 अंकी आधार नंबर टाईप करून पाठवा.
स्टेप 5: ओटीपी व्हेरिफिकेशन तुमच्या लिंक केलेल्या मोबाईल नंबरवर 6 अंकी ओटीपी येईल, तो चॅटमध्ये टाकून पडताळणी पूर्ण करा.
स्टेप 6: डॉक्युमेंट निवडा तुमच्या समोर कागदपत्रांची यादी येईल, त्यातील “Aadhaar” हा पर्याय निवडा.
स्टेप 7: पीडीएफ डाऊनलोड करा तुमचे ई-आधार काही सेकंदात पीडीएफ फाईलच्या स्वरूपात चॅटमध्ये येईल, ती तुम्ही डाऊनलोड करू शकता.
आधार पीडीएफ फाईलचा पासवर्ड
तुमची आधार फाईल सुरक्षित असते, ती उघडण्यासाठी एक खास पासवर्ड वापरावा लागेल. हा पासवर्ड म्हणजे तुमच्या नावातील पहिली 4 अक्षरे (कॅपिटलमध्ये) आणि तुमचे जन्म वर्ष. उदा. तुमचे नाव SUMIT असेल आणि जन्म वर्ष 1992 असेल, तर पासवर्ड SUMI1992 असा असेल.
या सुविधेचे फायदे
- कोणताही वेगळा अॅप डाऊनलोड करण्याची कटकट उरत नाही.
- ही सेवा पूर्णपणे विनामूल्य आहे.
- ही डिजिटल कागदपत्रे सर्व ठिकाणी कायदेशीररित्या ग्राह्य धरली जातात.










