Home / देश-विदेश / Air Travel New Rules: विमान प्रवाशांचे पैसे वाचणार! तिकीट बुक केल्यावर 48 तासांत कॅन्सेलेशन आता पूर्णपणे मोफत

Air Travel New Rules: विमान प्रवाशांचे पैसे वाचणार! तिकीट बुक केल्यावर 48 तासांत कॅन्सेलेशन आता पूर्णपणे मोफत

Air Travel New Rules: विमानाने प्रवास करणाऱ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. अनेकदा तिकीट बुक केल्यानंतर काही कारणास्तव...

By: Team Navakal
Air Travel New Rules
Social + WhatsApp CTA

Air Travel New Rules: विमानाने प्रवास करणाऱ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. अनेकदा तिकीट बुक केल्यानंतर काही कारणास्तव प्रवासाचा प्लॅन बदलावा लागतो, अशा वेळी विमान कंपन्यांकडून आकारले जाणारे भरमसाठ कॅन्सेलेशन चार्जेस प्रवाशांच्या खिशाला कात्री लावतात. प्रवाशांची हीच अडचण दूर करण्यासाठी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) नियमांमध्ये ऐतिहासिक बदल केला आहे.

काय आहे हा ’48 तास लुक-इन’ पर्याय?

नवीन नियमांनुसार, आता प्रवाशांना तिकीट बुकिंगनंतर 48 तासांचा ‘लुक-इन’ कालावधी मिळणार आहे. याचा अर्थ असा की, तिकीट बुक केल्यापासून पुढील 48 तासांच्या आत तुम्ही ते तिकीट कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय रद्द करू शकता किंवा त्यात बदल करू शकता. या काळात विमान कंपन्यांना कोणतेही दंड आकारता येणार नाहीत.

या सुविधेसाठी ‘या’ अटी पाळाव्या लागतील:

  1. वेळेची मर्यादा: हा नियम केवळ बुकिंगच्या पहिल्या 48 तासांसाठीच लागू असेल. त्यानंतर सामान्य नियम लागू होतील.
  2. देशार्गत उड्डाणे: तिकीट बुक केल्यापासून विमानाचे उड्डाण किमान 7 दिवस नंतरचे असणे आवश्यक आहे.
  3. आंतरराष्ट्रीय उड्डाणे: परदेशातील प्रवासासाठी विमानाचे उड्डाण बुकिंगच्या तारखेपासून किमान 15 दिवस नंतरचे असावे.
  4. थेट बुकिंग: हा फायदा तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही तिकीट थेट संबंधित विमान कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवरून बुक केले असेल.
  5. भाड्यातील फरक: तिकीट बदलताना कॅन्सेलेशन फी लागणार नाही, मात्र नवीन तिकिटाचे दर जास्त असल्यास तो फरक प्रवाशाला भरावा लागेल.

रिफंडसाठी आता ‘डेडलाईन’ निश्चित

विमान कंपन्यांकडून पैसे परत मिळवण्यासाठी प्रवाशांना अनेक महिने वाट पाहावी लागत असे. मात्र, आता DGCA ने यासाठी कडक कालमर्यादा ठरवून दिली आहे:

  • क्रेडिट कार्ड: कार्डद्वारे पेमेंट केले असल्यास 7 कामकाजाच्या दिवसांत पैसे परत करावे लागतील.
  • ट्रॅव्हल एजंट: जर तिकीट एजंट किंवा पोर्टलवरून घेतले असेल, तर 14 दिवसांच्या आत रिफंड मिळणे अनिवार्य आहे.
  • रोख रक्कम: जर तुम्ही रोखीने तिकीट खरेदी केले असेल, तर ज्या कार्यालयातून तिकीट घेतले तिथे तत्काळ पैसे परत मिळतील.

कधीपासून लागू होणार नियम?

हे नवीन नियम 26 मार्च 2026 पासून देशभरात लागू होत आहेत. रिफंडमध्ये होणारी दिरंगाई आणि विमान कंपन्यांची मनमानी रोखण्यासाठी नियामक मंडळाने हे पाऊल उचलले आहे. प्रवाशांच्या वाढत्या तक्रारींची दखल घेऊन हा निर्णय घेण्यात आला असून यामुळे सर्वसामान्यांचा हवाई प्रवास अधिक सुखकर होणार आहे.

हे देखील वाचा – Strait of Hormuz Crisis: समुद्रात इराणची ‘वसुली’ सुरू! हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाण्यासाठी जहाजांकडे मागितले 18 कोटी रुपये

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या