Marathwada's spicy Raw Onion Chutney : पारंपरिक चवीसाठी (Traditional Taste) ओळखल्या जाणाऱ्या मराठवाड्यातील ही खास चटणी आजही ग्रामीण भागात तितकीच लोकप्रिय आहे. साध्या आणि सहज उपलब्ध साहित्यांपासून (Simple Ingredients) तयार होणारी ही चटणी गावठी चवीमुळे (Desi Flavor) प्रत्येकाच्या मनात घर करून बसते.
कांदा, लसूण , जिरे आणि लाल तिखटयांसारख्या मोजक्या साहित्यातून तयार होणारी ही चटणी खलबत्त्यात ठेचून बनवली जाते. कैरी घातल्यास तिची चव अजूनच आंबट-तिखटहोते आणि जीभेवर चटपटीत झणझणीतपणा (Spicy Punch) देते.
ग्रामीण भागात अजूनही ही चटणी गरम भाकरी आणि वाफाळत्या भातासोबत खाल्ली जाते. कमी वेळात तयार होणारी ही चटणी जेवणाची चव अनेक पटींनी वाढवते.
आजच्या धावपळीच्या जीवनात झटपट आणि चविष्ट पर्याय म्हणून ही चटणी पुन्हा चर्चेत आली आहे. खाद्यप्रेमींमध्ये तिची लोकप्रियता झपाट्याने वाढत असून एकदा खाल तर पुन्हा खाणार.
संपूर्ण रेसिपी वाचा –
साहित्य –
८-९ लसूण पाकळ्या (Garlic Cloves)
१ लहान चमचा जिरे (Cumin Seeds)
मीठ (Salt) – चवीनुसार
लाल तिखट (Red Chilli Powder) – चवीनुसार
कैरी (Raw Mango) – थोडी (असल्यास)
कृती –
सर्वप्रथम खलबत्त्यात (Mortar-Pestle) जिरे आणि लसूण टाकून चांगले वाटून घ्या.
त्यात कैरीचे छोटे तुकडे टाकून पुन्हा थोडे बारीक ठेचा करा.
आता त्यात कांद्याचे तुकडे घाला आणि कांदा चांगला ठेचून घ्या.
त्यानंतर लाल तिखट घालून पुन्हा एकजीव करून वाटून घ्या.
शेवटी चवीनुसार मीठ घाला.
तयार चटणी एका भांड्यात काढून त्यावर कच्चे तेल घाला.
टीप – कांद्याला पाणी सुटते म्हणून मीठ शेवटी घालावे.










