Home / लेख / नवीन Mahindra Thar घ्यायचा विचार आहे? महिन्याला किती हप्ता भरावा लागेल? जाणून घ्या

नवीन Mahindra Thar घ्यायचा विचार आहे? महिन्याला किती हप्ता भरावा लागेल? जाणून घ्या

Mahindra Thar EMI plan and down payment 2026 : भारतीय रस्त्यांवर आपली वेगळी ओळख निर्माण करणारी Mahindra Thar अनेकांच्या पसंतीची...

By: Team Navakal
Mahindra Thar
Social + WhatsApp CTA

Mahindra Thar EMI plan and down payment 2026 : भारतीय रस्त्यांवर आपली वेगळी ओळख निर्माण करणारी Mahindra Thar अनेकांच्या पसंतीची एसयूव्ही आहे. जर तुम्हालाही ही रांगडी गाडी आपल्या दारात उभी करायची असेल, तर आता मोठ्या रकमेची चिंता करण्याची गरज नाही. महिंद्राच्या या लोकप्रिय एसयूव्हीसाठी आता एक जबरदस्त फायनान्स प्लॅन समोर आला आहे, ज्याअंतर्गत तुम्ही केवळ 1 लाख रुपयांच्या डाउन पेमेंटवर ही गाडी घरी नेऊ शकता.

महिंद्रा थारची किंमत किती?

महिंद्रा थारच्या डिझेल बेस व्हेरिएंट (AXT) बद्दल बोलायचे झाले तर, याची एक्स-शोरूम किंमत 9.99 लाख रुपये आहे. जर तुम्ही ही गाडी दिल्ली किंवा मुंबई सारख्या शहरात खरेदी करत असाल, तर त्यावर नोंदणी शुल्क आणि विम्याचा खर्च मिळून तिची ऑन-रोड किंमत साधारण 11.36 लाख रुपयांपर्यंत जाते. यामध्ये सुमारे 87 हजार रुपये नोंदणी टॅक्स आणि 49 हजार रुपये विम्याचा समावेश आहे.

1 लाखाच्या डाउन पेमेंटवर किती असेल ईएमआय?

जर तुम्ही थारच्या डिझेल बेस व्हेरिएंटसाठी 1 लाख रुपयांचे डाउन पेमेंट केले, तर तुम्हाला उर्वरित 10.36 लाख रुपयांचे कर्ज बँकेकडून घ्यावे लागेल.

  1. कर्जाची रक्कम: 10.36 लाख रुपये
  2. व्याजदर: 9 टक्के (अंदाजे)
  3. कालावधी: 7 वर्षे या हिशोबाने तुम्हाला पुढील 7 वर्षांसाठी दरमहा सुमारे 16,667 रुपयांचा हप्ता (EMI) भरावा लागेल.

एकूण किती पडणार महागात?

बँकेकडून 9 टक्के व्याजाने 7 वर्षांसाठी कर्ज घेतल्यास, तुम्हाला या कालावधीत सुमारे 3.64 लाख रुपये व्याजापोटी द्यावे लागतील. अशा प्रकारे, एक्स-शोरूम किंमत, ऑन-रोड खर्च आणि व्याजाचे पैसे मिळून या गाडीची एकूण किंमत तुम्हाला साधारण 15 लाख रुपयांच्या आसपास पडेल.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
Topics:
संबंधित बातम्या