Beijing Plane Crash – चीनची राजधानी बीजिंगमध्ये शुक्रवारी घडलेल्या एका धक्कादायक विमान दुर्घटनेने (Beijing Plane Crash)संपूर्ण शहर हादरले आहे. शहरातील सर्वात उंच आणि प्रतिष्ठित इमारतींपैकी एक असलेल्या सीआयटीआयसी टॉवर (CITIC Tower) अर्थात ‘चायना झुन’ (China Zun) या १०९ मजली गगनचुंबी इमारतीला एका स्पोर्ट्स विमानाने (Sports Aircraft) धडक दिली. या दुर्घटनेत विमानाचा पायलट मृत्युमुखी (Pilot Killed)पडला असून १३ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
बीजिंगच्या मध्यवर्ती व्यावसायिक भागात (Central Business District) घडलेल्या या घटनेमुळे काही काळ परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले. धडकेनंतर इमारतीच्या बाहेरील भागाचे नुकसान झाले, तर विमानाचे तुकडे खाली रस्त्यावर कोसळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.या घटनेनंतर बीजिंगमधील हवाई सुरक्षा (Air Safety) व्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रशासनाने परिसर सील करून तपास यंत्रणांना चौकशीचे आदेश दिले आहेत.
१०९ मजली इमारतीला धडक

मिळालेल्या माहितीनुसार, धडकलेले विमान सनवर्ड एसए 60एल ऑरोरा (Sunward SA 60L Aurora) हे दोन आसनी स्पोर्ट्स विमान होते. बीजिंगच्या मध्यवर्ती व्यावसायिक भागात (Business District) असलेल्या १०९ मजली सीआयटीआयसी टॉवरच्या वरच्या भागाला हे विमान धडकले. धडकेनंतर इमारतीच्या काचा फुटल्या आणि विमानाचे काही तुकडे खाली रस्त्यावर कोसळले.
दुर्घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला असून त्यामध्ये इमारतीतून अवशेष खाली पडताना दिसत आहेत. विमान इमारतीला धडकल्यानंतर परिसरात घबराट पसरली. इमारतीतील कर्मचाऱ्यांना तातडीने बाहेर काढण्यात आले. काही मिनिटांतच अग्निशमन दल, पोलीस आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या.
टक्कर होताच विमानाचे तुकडे झाले
ब्रिटिश वृत्तपत्र ‘द सन’च्या (The Sun) वृत्तानुसार, व्हायरल व्हिडीओमध्ये विमान इमारतीच्या एका भागावर आदळताना दिसत आहे. या धडकेमुळे इमारतीतील काचा फुटल्या, तर विमानाचे अनेक तुकडे होऊन ते वरून खाली कोसळताना दिसत आहेत. जमिनीवर पडलेल्या अवशेषांमधून धूर निघतानाही दिसत असल्याचे व्हिडीओमध्ये स्पष्ट झाले आहे.

इमारत रिकामी करण्यात आली

घटनेनंतर तातडीने संपूर्ण इमारत रिकामी (Evacuate) करण्यात आली. सीआयटीआयसी टॉवर हा बीजिंगच्या चाओयांग जिल्ह्यातील (Chaoyang District) प्रमुख व्यावसायिक परिसरात स्थित आहे. शांघाय टॉवर (Shanghai Tower) आणि पिंग अॅन फायनान्स सेंटर (Ping An Finance Centre) नंतर ही चीनमधील तिसरी सर्वात उंच इमारत मानली जाते.
कोणते विमान होते?
घटनास्थळी मिळालेल्या छायाचित्रांमध्ये सनवर्ड SA 60L ऑरोरा – B-12PP या विमानाचा एक पंख इमारतीच्या बाजूला पडलेला दिसत आहे. हे चीनमध्ये तयार करण्यात आलेल्या यशस्वी हलक्या विमानांपैकी एक मानले जाते. काही छायाचित्रांमध्ये इमारतीच्या बाहेरील भागात भगदाड पडल्याचेही दिसून आले आहे.
उड्डाणानंतर अर्ध्या तासातच भरकटले
B-12PP विमानाचे वैमानिक एकटेच उड्डाण करत होते. त्यांनी शिफोसी विमानतळावरून (Shifosi Airport) उड्डाण केले होते. सायंकाळी ५.४० वाजता विमान परत विमानतळावर उतरण्यासाठी येत असताना त्याने नियोजित उड्डाणमार्ग (Flight Path) सोडल्याची माहिती समोर आली आहे.उड्डाणावर नजर ठेवणाऱ्या यंत्रणेनुसार विमानाचा शेवटचा सिग्नल (Last Signal) बीजिंगच्या ईस्ट फिफ्थ रिंग रोड (East Fifth Ring Road) परिसरात मिळाला. त्यानंतर विमानाशी संपर्क पूर्णपणे तुटला.
अनेक रस्ते बंद
बचाव आणि मदतकार्य (Rescue Operation) सुरळीत पार पडावे यासाठी सुरक्षा यंत्रणांनी इमारतीभोवतालचे अनेक रस्ते पूर्णपणे बंद केले आहेत. पोलीस, अग्निशमन दल आणि इतर आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी मदतकार्य आणि तपासाचे काम करत आहेत.
अपघातात किती जण जखमी झाले किंवा मृत्यू झाला याबाबत सुरुवातीला अधिकृत माहिती समोर आली नव्हती. तसेच विमान कोणत्या कारणामुळे भरकटले आणि दुर्घटनेमागील नेमके कारण काय होते, याबाबतही अधिकृत खुलासा करण्यात आलेला नाही. मात्र, या घटनेमुळे संपूर्ण बीजिंग शहर हादरले असून हवाई सुरक्षेबाबत नव्याने चर्चा सुरू झाली आहे.
हे देखील वाचा –
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; चंद्रपूरच्या एकाच कुटुंबातील ५ जणांचा जागीच मृत्यू
TET परीक्षा ऐनवेळी रद्द; पेपरफुटीच्या संशयानंतर सरकारचा मोठा निर्णय, विरोधक आक्रमक
मन की बात’मध्ये नांदेडच्या पेठकर कुटुंबाचे कौतुक; ३,५०० ग्रामस्थांना दिले अपघात विमा संरक्षण










