Home / Uncategorized / Maharashtra Fuel Supply Normal : आखातातील युद्धाच्या अफवेने महाराष्ट्रात ‘इंधन धग’; पेट्रोल पंपांवर नागरिकांच्या झुंबडी, तर प्रशासनाचे ‘साठा पुरेसा’ असल्याचे स्पष्टीकरण

Maharashtra Fuel Supply Normal : आखातातील युद्धाच्या अफवेने महाराष्ट्रात ‘इंधन धग’; पेट्रोल पंपांवर नागरिकांच्या झुंबडी, तर प्रशासनाचे ‘साठा पुरेसा’ असल्याचे स्पष्टीकरण

Maharashtra Fuel Supply Normal : आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर देशात पेट्रोल आणि डिझेलचा प्रचंड तुटवडा निर्माण होणार...

By: Team Navakal
Maharashtra Fuel Supply Normal
Social + WhatsApp CTA

Maharashtra Fuel Supply Normal : आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर देशात पेट्रोल आणि डिझेलचा प्रचंड तुटवडा निर्माण होणार असल्याची एक आवई आज राज्यभरात पसरली. या अफवेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, राज्याच्या कानाकोपऱ्यात पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या. अचानक वाढलेल्या मागणीमुळे अनेक ठिकाणचा इंधन साठा संपुष्टात आल्याने पंपांवर ‘नो पेट्रोल’चे फलक झळकले, ज्यामुळे संभ्रमात अधिकच भर पडली. मात्र, राज्य प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करत या सर्व निव्वळ अफवा असल्याचे स्पष्ट केले असून देशात इंधनाचा मुबलक साठा उपलब्ध असल्याची ग्वाही दिली आहे.

जिल्ह्या-जिल्ह्यांतून समोर आलेले चित्र-
राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये या अफवेचा मोठा परिणाम दिसून आला. भंडारा, नांदेड, नागपूर, वर्धा, यवतमाळ, अहिल्यानगर आणि कोल्हापूर यांसह अनेक भागांत इंधन भरण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली.

भंडारा व नांदेड: भंडारा जिल्ह्यात मध्यरात्रीपर्यंत नागरिक रांगांमध्ये उभे होते. अनेक वाहनधारकांनी केवळ वाहनांच्या टाक्या पूर्ण भरून घेतल्या नाहीत, तर भविष्यातील भीतीपोटी कॅनमध्येही बेकायदेशीरपणे इंधन साठवण्याचा प्रयत्न केला. नांदेडमध्येही अशाच प्रकारची झुंबड पाहायला मिळाली.

यवतमाळ व वर्धा: यवतमाळच्या मारेगाव, घाटंजी आणि वणी परिसरात परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून पोलीस बंदोबस्त तैनात करावा लागला. वर्ध्यात तर पेट्रोल पंप उघडण्यापूर्वीच पहाटेपासून नागरिकांनी गर्दी केली होती.

प्रशासकीय अधिकाऱ्यांशी झटापट आणि व्हिडिओ व्हायरल-
या धावपळीच्या दरम्यान काही ठिकाणी तणावाच्या घटनाही घडल्या. भंडारा जिल्ह्यातील मोहाडी येथे इंधन साठ्याची तपासणी करण्यासाठी गेलेल्या नायब तहसीलदारांशी पेट्रोल पंप चालकाचा वाद झाला. या वादाचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर वेगाने प्रसारित झाला असून प्रशासकीय कामात अडथळा निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. तसेच, नागरिकांनी सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवून प्लॅस्टिकच्या कॅनमध्ये इंधन भरतानाचे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत, ज्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला होता.

प्रशासनाचे आवाहन: अफवांवर विश्वास ठेवू नका-
इंधन टंचाईच्या वृत्ताचा खंडन करण्यासाठी जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी सरसावले आहेत. वर्धा जिल्ह्याचे पुरवठा अधिकारी राजू रणवीर यांनी स्पष्ट केले की, “जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. पुरवठा साखळीत कोणताही अडथळा आलेला नाही.”

Web Title:
Topics:
संबंधित बातम्या