Home / लेख / Vida V2 Plus KKR Edition: आयपीएल चाहत्यांसाठी Hero Vida ची खास भेट; केकेआर थीमवर नवीन स्कूटर लाँच; पाहा काय आहे खास

Vida V2 Plus KKR Edition: आयपीएल चाहत्यांसाठी Hero Vida ची खास भेट; केकेआर थीमवर नवीन स्कूटर लाँच; पाहा काय आहे खास

Vida V2 Plus KKR limited edition electric scooter : आयपीएलच्या रणधुमाळीत हिरो मोटोकॉर्पच्या ‘विडा’ या इलेक्ट्रिक ब्रँडने क्रिकेट चाहत्यांसाठी एक...

By: Team Navakal
Vida V2 Plus KKR Edition
Social + WhatsApp CTA

Vida V2 Plus KKR limited edition electric scooter : आयपीएलच्या रणधुमाळीत हिरो मोटोकॉर्पच्या ‘विडा’ या इलेक्ट्रिक ब्रँडने क्रिकेट चाहत्यांसाठी एक खास भेट आणली आहे. कंपनीने आपला लोकप्रिय इलेक्ट्रिक स्कूटर Vida V2 Plus चे ‘KKR लिमिटेड एडिशन’ बाजारात उतरवले आहे.

कोलकाता नाईट रायडर्स (KKR) या आयपीएल टीमच्या थीमवर आधारित असलेला हा स्कूटर दिसायला अत्यंत आकर्षक असून क्रिकेट प्रेमींच्या पसंतीस उतरत आहे.

केकेआरच्या रंगात न्हालेला नवा लूक

या लिमिटेड एडिशन स्कूटरच्या डिझाइनमध्ये कोलकाता नाईट रायडर्सच्या जांभळ्या (Purple) आणि सोनेरी (Gold) रंगांची थीम स्पष्टपणे दिसून येते. स्कूटरच्या बॉडीवर गोल्डन रंगाचे हाफटोन ग्रेडिएंट आणि मायक्रो-डॉट्सचे विशेष पॅटर्न देण्यात आले आहेत, जे पर्ल ब्लॅक रंगासोबत अतिशय सुंदर दिसतात.

विशेष म्हणजे, या डिझाइनमध्ये 3 खुणा देण्यात आल्या आहेत, ज्या केकेआरने आतापर्यंत मिळवलेल्या 3 आयपीएल विजेतेपदांचे प्रतीक आहेत. हा स्कूटर केवळ निवडक आउटलेट्सवर उपलब्ध असेल आणि केकेआरच्या विजयाप्रसंगी कंपनी हा स्कूटर खेळाडूंना भेट म्हणून देणार आहे.

फीचर्समध्ये काय आहे खास?

या स्कूटरच्या अंतर्गत तांत्रिक रचनेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही, मात्र बाह्य सौंदर्यासाठी नवीन ग्राफिक्स आणि कलर स्कीम वापरली गेली आहे.

  1. रेंज आणि स्पीड: हा स्कूटर एका सिंगल चार्जमध्ये 142 किलोमीटरची रेंज देतो असा कंपनीचा दावा आहे. याची टॉप स्पीड 80 किलोमीटर प्रति तास इतकी आहे.
  2. चार्जिंग: बॅटरी पूर्ण चार्ज होण्यासाठी फास्ट चार्जिंगमध्ये केवळ 62 मिनिटे लागतात, तर सामान्य एसी चार्जिंगसाठी 4 तास 13 मिनिटे लागतात.
  3. वेग: हा इलेक्ट्रिक स्कूटर 0 ते 40 किलोमीटरचा वेग अवघ्या 3.1 सेकंदात पकडतो.
  4. इतर सोयी: यात 4.3 इंचाचा टीएफटी डिस्प्ले मिळतो. तसेच, याची बॅटरी रिमूव्हेबल (काढता येण्याजोगी) असल्याने तुम्ही ती फ्लॅटमध्ये नेऊनही चार्ज करू शकता.

किंमत आणि बॅटरी सेवा

Vida V2 Plus ची सुरुवातीची किंमत 94,800 रुपये आहे. मात्र, ‘बॅटरी ॲज अ सर्व्हिस’ (BaaS) योजनेअंतर्गत तुम्ही बॅटरीचे सबस्क्रिप्शन घेतल्यास या स्कूटरची एक्स-शोरूम किंमत 70,000 रुपयांपर्यंत खाली येते. केकेआर एडिशनच्या किंमतीबाबत कंपनीने अद्याप अधिकृत खुलासा केलेला नाही. या स्कूटरसोबतच कंपनीने केकेआर थीमचा विशेष हेल्मेटदेखील बाजारात आणला आहे.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
Topics:
संबंधित बातम्या