Motorola Signature smartphone price cut Offers : स्मार्टफोन मार्केटमध्ये आपली पकड मजबूत करण्यासाठी मोटोरोलाने आपल्या प्रीमियम Motorola Signature या फ्लॅगशिप फोनच्या किमतीत मोठी कपात केली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच जानेवारी 2026 मध्ये लाँच झालेला हा फोन आता स्वस्त दरात खरेदी करण्याची संधी ग्राहकांना मिळत आहे.
उत्कृष्ट कॅमेरा आणि जबरदस्त परफॉर्मन्ससाठी ओळखल्या जाणाऱ्या या फोनवर बँक ऑफर्स आणि एक्सचेंजचा लाभ घेतल्यास मोठी बचत होऊ शकते.
किंमत आणि धमाकेदार ऑफर्स
Motorola Signature चा 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंट 59,999 रुपयांना लाँच झाला होता. मात्र, आता हा फोन 52,919 रुपयांमध्ये लिस्ट करण्यात आला आहे.
- बँक ऑफर: फेडरल बँकेच्या स्कॅपिआ क्रेडिट कार्डचा वापर केल्यास 5 टक्के म्हणजेच सुमारे 1,500 रुपयांपर्यंत झटपट सवलत मिळेल. यामुळे प्रभावी किंमत 51,419 रुपये होईल.
- एक्स्चेंज ऑफर: जुना फोन बदलून घेतल्यास तुम्हाला 24,950 रुपयांपर्यंतची बचत होऊ शकते. लाँचिंग किमतीच्या तुलनेत हा फोन आता जवळपास 8,580 रुपये स्वस्त मिळत आहे.
दमदार फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
- डिस्प्ले: या फोनमध्ये 6.8 इंचाचा सुपर एचडी एलटीपीओ एक्स्ट्रीम एमोलेड डिस्प्ले आहे. याचा रिफ्रेश रेट 165Hz असून 6,200 निट्सपर्यंतची रेकॉर्डब्रेक पीक ब्राइटनेस मिळते.
- प्रोसेसर: वेगासाठी यामध्ये क्वालकॉमचा सर्वात शक्तिशाली ‘स्नॅपड्रॅगन 8 जेन 5’ प्रोसेसर देण्यात आला आहे. हा फोन अँड्रॉइड 16 वर आधारित हॅलो यूआय (Hello UI) वर चालतो.
- कॅमेरा सेटअप: फोटोग्राफीसाठी मागील बाजूला 50-50-50 मेगापिक्सलचा ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये प्रायमरी, अल्ट्रावाईड आणि पेरिस्कोप टेलिफोटो लेन्सचा समावेश आहे. सेल्फीसाठी समोरच्या बाजूलाही 50 मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे.
- बॅटरी आणि सुरक्षितता: यामध्ये 5,200mAh ची बॅटरी असून ती 90W वायर्ड आणि 50W वायरलेस फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. तसेच, धूळ आणि पाण्यापासून संरक्षणासाठी याला IP68 आणि IP69 रेटिंगसह मिलिटरी-ग्रेड प्रमाणपत्रही मिळाले आहे.
मोटोरोलाचा हा फोन केवळ 6.99 मिमी जाडीचा असून त्याचे वजन 186 ग्रॅम आहे, ज्यामुळे तो हातात पकडण्यास अत्यंत स्लिम आणि प्रीमियम वाटतो.











