Home / महाराष्ट्र / Rupali Chakankar Resign: रुपाली चाकणकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा! भोंदू खरात प्रकरण नडले

Rupali Chakankar Resign: रुपाली चाकणकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा! भोंदू खरात प्रकरण नडले

Rupali Chakankar Resign: नाशिकमधील स्वयंघोषित भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणामुळे निर्माण झालेल्या राजकीय वादाच्या पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट)...

By: Team Navakal
Rupali Chakankar Resign
Social + WhatsApp CTA

Rupali Chakankar Resign: नाशिकमधील स्वयंघोषित भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणामुळे निर्माण झालेल्या राजकीय वादाच्या पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) ज्येष्ठ नेत्या रुपाली चाकणकर यांनी आपल्या ‘महिला प्रदेशाध्यक्ष’ पदाचा राजीनामा दिला आहे.

काही दिवसांपूर्वीच त्यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा त्याग केला होता. आता पक्षातील महत्त्वाच्या जबाबदारीतूनही त्यांनी मुक्त होण्याचा निर्णय घेतला असून, सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

काय म्हणाल्या रुपाली चाकणकर? (ट्विट)

राजीनाम्याबाबत माहिती देताना रुपाली चाकणकर यांनी ट्विट केले की:

“खरात प्रकरणाबाबत पहिल्या दिवशीच मी माझी भूमिका स्पष्ट केली आहे. त्याच्या आर्थिक व्यवहारात, त्याच्या गैरकृत्यात दुरान्वये संबंध नाही, आजही तीच स्पष्ट व ठाम भूमिका आहे. तपासादरम्यान या सर्व बाबी निष्पन्न होतीलच. खोटे, असत्य व कुठलाही पुरावा नसताना जे आरोप माध्यमांमधून होत आहेत, ते वेदनादायक आहे. सत्य प्रखरतेने सिद्ध होईलच.”

त्यांनी पुढे नमूद केले की, “हा तपास पारदर्शकपणे व निष्पक्षपणे व्हावा, ही माझी मागणी मी यापूर्वीच मा. मुख्यमंत्री, मा. उपमुख्यमंत्री, मा. पोलिस महासंचालक यांच्याकडे केली आहे. आज सकाळी फोनद्वारे आदरणीय सुनेत्रावहिनी पवार यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार मी माझ्या राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे.”

वादाचे नेमके कारण काय?

अशोक खरात याला बलात्काराच्या आरोपाखाली अटक झाल्यानंतर, रुपाली चाकणकर यांचे खरातसोबतचे काही जुने फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले होते. यामध्ये त्या खरात यांची पाद्यपूजा करताना दिसत होत्या. यावरून विरोधकांनी त्यांच्यावर सडकून टीका केली होती. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत गोटातूनही त्यांच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढला होता. पक्षाची प्रतिमा डागाळू नये यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी चाकणकर यांच्याशी चर्चा केल्यानंतर हा राजीनामा देण्यात आला आहे.

प्रशासकीय आणि राजकीय परिणाम

महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता पक्षातील पदही गेल्यामुळे रुपाली चाकणकर यांच्या राजकीय कारकीर्दीसमोर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, सरकारने या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथकाची (SIT) स्थापना केली आहे.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या