IPL 2026 opening match RCB vs SRH : जगभरातील क्रिकेट चाहत्यांची प्रतीक्षा संपली असून इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2026) नव्या हंगामाला 28 मार्चपासून सुरुवात होत आहे. सलामीचा सामना बेंगळुरूच्या ऐतिहासिक एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर रंगणार असून यामध्ये गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) समोरासमोर असतील.
विशेष म्हणजे, 2025 मध्ये पहिले विजेतेपद पटकावल्यानंतर आरसीबीचा संघ पहिल्यांदाच चॅम्पियन म्हणून मैदानात उतरणार आहे.
यंदा उद्घाटन सोहळा का नाही?
आयपीएलच्या प्रत्येक हंगामाची सुरुवात जंगी उद्घाटन सोहळ्याने होते, मात्र यंदा आयपीएल 2026 मध्ये कोणताही ओपनिंग सेरेमनी होणार नाही. 4 जून 2025 रोजी झालेल्या विजय मिरवणुकीतील दुर्घटनेतील बळींना श्रद्धांजली वाहण्यासाठी आयोजकांनी हा सोहळा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
आमनेसामने: आरसीबी विरुद्ध हैदराबाद
आयपीएल इतिहासात हे दोन्ही संघ आतापर्यंत 26 वेळा एकमेकांशी भिडले आहेत. यामध्ये दोन्ही संघांमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळाली आहे. हैदराबादने 13 सामन्यांत विजय मिळवला आहे, तर बेंगळुरूने 11 सामने जिंकले आहेत. 2 सामन्यांचा निकाल लागू शकला नव्हता.
सामन्याची वेळ आणि थेट प्रक्षेपण
- स्थळ: एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगळुरू.
- वेळ: सामना संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल, तर नाणेफेक (टॉस) संध्याकाळी 7:00 वाजता होईल.
- टीव्ही चॅनल: स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर सामन्याचा थेट आनंद घेता येईल.
- लाईव्ह स्ट्रीमिंग: जिओ प्लस हॉटस्टारवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण उपलब्ध असेल.
दोन्ही संघांचे खेळाडू (Squads)
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू: विराट कोहली, फिलिप सॉल्ट, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (कर्णधार), टिम डेव्हिड, जितेश शर्मा, कृणाल पांड्या, रोमॅरियो शेफर्ड, भुवनेश्वर कुमार, सुयश शर्मा, जेकब डफी, जोश हेझलवूड, रसिक सलाम डार, व्यंकटेश अय्यर, मंगेश यादव, विहान मल्होत्रा, विकी ओस्तवाल, अभिनंदन सिंग, जेकब बेथेल, जॉर्डन कॉक्स, स्वप्नील सिंग, कनिष्क चौहान, सात्विक देशवाल.
सनरायझर्स हैदराबाद: अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, इशान किशन (कर्णधार), लिआम लिव्हिंगस्टोन, हेनरिक क्लासेन, अनिकेत वर्मा, नितीश कुमार रेड्डी, हर्षल पटेल, जयदेव उनाडकट, हर्ष दुबे, ईशान मलिंगा, शिवम मावी, स्मरण रविचंद्रन, झीशान अंसारी, सलिल अरोरा, कामिंदू मेंडिस, ब्रायडन कार्स, डेव्हिड पेन, प्रफुल्ल हिंगे, साकिब हुसेन, क्रेन्स फुलेट्रा, अमित कुमार.










