Home / महाराष्ट्र / Mumbai Local Mega Block : मुंबईकरांनो लक्ष द्या! रेल्वेच्या मेगाब्लॉकमुळे उपनगरीय वाहतूक विस्कळीत; मुंबई रेल्वेचा ‘महा-ब्लॉक’- २९९ फेऱ्या रद्द

Mumbai Local Mega Block : मुंबईकरांनो लक्ष द्या! रेल्वेच्या मेगाब्लॉकमुळे उपनगरीय वाहतूक विस्कळीत; मुंबई रेल्वेचा ‘महा-ब्लॉक’- २९९ फेऱ्या रद्द

Mumbai Local Mega Block : मुंबईतील उपनगरीय रेल्वे प्रवाशांसाठी हा शनिवार आणि रविवार अत्यंत कठीण जाण्याची शक्यता आहे. पश्चिम रेल्वेने...

By: Team Navakal
Mumbai Local Mega Block
Social + WhatsApp CTA

Mumbai Local Mega Block : मुंबईतील उपनगरीय रेल्वे प्रवाशांसाठी हा शनिवार आणि रविवार अत्यंत कठीण जाण्याची शक्यता आहे. पश्चिम रेल्वेने कांदिवली आणि बोरिवली स्थानकांदरम्यान महत्त्वाच्या तांत्रिक कामासाठी तब्बल २० तासांचा मेगाब्लॉक जाहीर केला आहे. या ब्लॉकमुळे शनिवार आणि रविवार मिळून एकूण २९९ लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या असून, मध्य आणि ट्रान्स-हार्बर मार्गावरही देखभालीच्या कामांमुळे वाहतूक विस्कळीत होणार आहे.

पश्चिम रेल्वे: पायाभूत सुविधांच्या विस्तारासाठी २० तासांचा मेगाब्लॉक
पश्चिम रेल्वेवरील कांदिवली ते बोरिवली दरम्यान असलेल्या ‘पूल क्रमांक ६१’ च्या पुनर्बांधणीसाठी आणि हार्बर मार्गाच्या विस्तारीकरणासाठी रेल्वे प्रशासनाने कंबर कसली आहे. या कामांतर्गत कांदिवली ते मालाड दरम्यान प्री-स्ट्रेस्ड काँक्रीट स्लॅब बसवण्यात येणार आहेत, तसेच कांदिवलीजवळ डेक स्पॅन उभारणीसाठी गर्डर टाकण्याचे गुंतागुंतीचे कामही केले जाईल.

फेऱ्यांवर परिणाम: या २० तासांच्या प्रदीर्घ ब्लॉकमुळे शनिवारी ४५ आणि रविवारी २५४ अशा एकूण २९९ फेऱ्या रद्द राहतील.

वाहतुकीचे नियोजन: ब्लॉकच्या कालावधीत धीम्या मार्गावरील सर्व लोकल गाड्या गोरेगाव ते बोरिवली दरम्यान जलद मार्गिकेवर वळवण्यात येतील. काही गाड्या अंधेरी ते बोरिवली दरम्यान पाचव्या मार्गावरून धावतील.

प्रवाशांची गैरसोय: या बदलांमुळे राम मंदिर, मालाड आणि कांदिवली या स्थानकांवर डाऊन दिशेकडील गाड्यांना थांबा दिला जाणार नाही. तसेच १५ डब्यांच्या सर्व धीम्या गाड्या अंधेरी ते बोरिवली दरम्यान जलद गाड्या म्हणून चालवल्या जातील. काही लोकल गाड्यांचे प्रवास अंधेरी किंवा गोरेगाव स्थानकावरच संपवून त्या तेथूनच परतीच्या प्रवासासाठी रवाना केल्या जातील.

मध्य रेल्वे आणि ट्रान्स-हार्बर मार्गावरही ब्लॉक
केवळ पश्चिम रेल्वेच नव्हे, तर मध्य रेल्वेच्या प्रवाशांनाही रविवारी नियोजित ब्लॉकचा फटका बसणार आहे. माटुंगा ते मुलुंड दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ या वेळेत रुळ आणि सिग्नल यंत्रणेच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले जाईल. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या असून उर्वरित गाड्या विलंबाने धावतील.

ट्रान्स-हार्बर आणि हार्बर मार्ग:
ठाणे ते वाशी/नेरुळ आणि ठाणे ते पनवेल या मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० या कालावधीत ब्लॉक असेल, ज्यामुळे या मार्गावरील अप आणि डाऊन फेऱ्या रद्द राहतील.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या