Home / लेख / Smart TV Offers: आयपीएल पाहण्याचा आनंद होईल दुप्पट! निम्म्या किमतीत घरी आणा 55 इंचाचा मोठा स्मार्ट टीव्ही

Smart TV Offers: आयपीएल पाहण्याचा आनंद होईल दुप्पट! निम्म्या किमतीत घरी आणा 55 इंचाचा मोठा स्मार्ट टीव्ही

Smart TV Offers: आयपीएलचे सामने असोत किंवा अ‍ॅक्शनने भरपूर वेबसीरीज, मोठ्या स्क्रीनवर कंटेंट पाहण्याची मजा काही वेगळीच असते. जर तुम्हीही...

By: Team Navakal
Smart TV Offers
Social + WhatsApp CTA

Smart TV Offers: आयपीएलचे सामने असोत किंवा अ‍ॅक्शनने भरपूर वेबसीरीज, मोठ्या स्क्रीनवर कंटेंट पाहण्याची मजा काही वेगळीच असते. जर तुम्हीही जुना टीव्ही बदलून ५५ इंचाचा मोठा ४के स्मार्ट टीव्ही घेण्याच्या विचारात असाल, तर अ‍ॅमेझॉनवर सध्या ऑफर्सचा पाऊस पडत आहे.

सॅमसंग, एलजी, शाओमी आणि टीसीएल यांसारख्या दिग्गज कंपन्यांचे प्रिमियम टीव्ही आता मूळ किमतीच्या जवळपास निम्म्या किमतीत घरी आणता येणार आहेत.

पाहा कोणत्या ब्रँडवर मिळतेय किती सूट:

१. सॅमसंग क्रिस्टल ४के टीव्ही (Samsung Crystal 4K TV) सॅमसंगचा हा ५५ इंचाचा एलईडी स्मार्ट टीव्ही सध्या ३९,९९० रुपयांना उपलब्ध आहे. मूळ किमतीवर ३२ टक्क्यांची सवलत देण्यात आली असून, हा टीव्ही ‘टायझेन ओएस’वर चालतो. यामध्ये ५० हर्ट्झ रिफ्रेश रेट असलेली स्क्रीन आणि उत्तम पिक्चर क्वालिटी मिळते.

२. शाओमी (Xiaomi Smart TV) बजेटमध्ये ५५ इंचाची मोठी स्क्रीन शोधणाऱ्यांसाठी शाओमीचा पर्याय उत्तम आहे. हा टीव्ही २९,९९९ रुपयांना खरेदी करता येईल. यावर ४५ टक्क्यांपर्यंत सूट असून, यात २० वॅटचा डॉल्बी ऑडिओ आणि गुगल टीव्ही ऑपरेटिंग सिस्टम दिली आहे.

३. एलजी एआय टीव्ही (LG UA82 AI TV) एलजीच्या या स्मार्ट टीव्हीवर ३८ टक्क्यांची सूट मिळत असून त्याची प्रभावी किंमत ४०,९९० रुपये आहे. ‘वेब ओएस’वर चालणाऱ्या या टीव्हीमध्ये ६० हर्ट्झची स्क्रीन आणि डॉल्बी ऑडिओचा सपोर्ट आहे. बँक ऑफर्स आणि २,००० रुपयांचे कूपन वापरून हा टीव्ही अधिक स्वस्त होऊ शकतो.

४. टीसीएल ४के टीव्ही (TCL 4K TV) टीसीएलच्या ५५ इंचाच्या टीव्हीवर तब्बल ६० टक्क्यांची मोठी सवलत मिळत आहे. ४७,९९० रुपयांच्या या टीव्हीवर ३,००० रुपयांचे अतिरिक्त कूपन डिस्काउंटही उपलब्ध आहे. बेझललेस डिझाइन असलेला हा ४के टीव्ही गुगल टीव्ही प्लॅटफॉर्मला सपोर्ट करतो.

५. व्ह्यू क्यूएलईडी टीव्ही (Vu QLED TV) उत्कृष्ट रंगसंगती आणि ब्राइटनेससाठी प्रसिद्ध असलेला ‘व्ह्यू’चा क्यूएलईडी टीव्ही ३४,४९० रुपयांना मिळत आहे. यावर ४३ टक्क्यांचा बंपर डिस्काउंट दिला असून, हा अँड्रॉइड टीव्ही प्लॅटफॉर्मवर आधारित आहे.

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
Topics:
संबंधित बातम्या