Sandipan Bhumre Driver FIR : छत्रपती संभाजीनगर शहरातील दाऊदपुरा परिसरातील सुमारे नऊ एकर जमिनीच्या हिबानामा प्रकरणात (Hibanama Case) शिंदे गटाचे खासदार संदिपान भुमरे (MP Sandipan Bhumre ) यांच्या चालकाविरोधात (driver ) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चालक जावेद रसूल शेख (Javed Rasool Sheikh) तसेच जमिनीचे मूळ मालक मीर मेहमूद अली यांच्याविरोधात आर्थिक फसवणूक, विश्वासघात आणि धमकी दिल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.
या प्रकरणात मुजाहिद इकबाल खान (Mujahid Iqbal khan) यांच्या फिर्यादीवरून जवाहरनगर पोलीस ठाण्यात (awaharnagar police station ) गुन्हा नोंदवण्यात आला असून, आर्थिक गुन्हे शाखा याकडून तपास सुरू करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, दाऊदपुरा परिसरातील संबंधित जमिनीचा काही भाग मीर मेहमूद अली यांनी आधी मुजाहिद इकबाल खान यांना हिबानामाद्वारे दिला होता. मात्र, त्याच जमिनीचा पुन्हा जावेद रसूल शेख यांच्या नावावर स्वतंत्र हिबानामा करून फसवणूक (financial fraud ) केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या दुहेरी हिबानाम्यामुळे प्रकरण अधिकच गुंतागुंतीचे बनले असून, जमीन व्यवहारात फसवणूक झाल्याचा दावा फिर्यादीकडून करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, तपासातून आणखी महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
2 हजार कोटींच्या जमिनीचा वाद
छत्रपती संभाजीनगरमध्ये खासदार संदिपान भुमरे आणि त्यांचा मुलगा आमदार विलास भुमरे यांच्या चालक जावेद शेख यांच्याशी संबंधित जमीन प्रकरणामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. हिबानामाद्वारे मिळालेल्या या जमिनीमुळे जावेद शेख चौकशीच्या भोवऱ्यात सापडले असून, या प्रकरणाकडे विविध यंत्रणांचे लक्ष लागले आहे.
या प्रकरणात आधीच आयकर विभागाकडून जावेद शेख यांना नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर आता या हिबानाम्यातील जमिनीची नेमकी किंमत किती, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. या पार्श्वभूमीवर तपास करणाऱ्या छत्रपती संभाजीनगर आर्थिक गुन्हे शाखेने महसूल विभागाकडे जमिनीचे शासकीय मूल्यांकन करण्याबाबत पत्र पाठवले होते.

गुन्हे शाखेचा तपास
महसूल विभागाने या संदर्भात दिलेल्या अधिकृत पत्राची प्रत एबीपी माझाच्या हाती लागली असून, त्यामध्ये जावेद शेख यांच्या नावावर हिबानामाद्वारे मिळालेल्या जमिनीचे शासकीय मूल्यांकन 241 कोटी 69 लाख 51 हजार 408 रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तर बाजारभावाचा विचार केल्यास या जमिनीची किंमत अंदाजे 2 हजार कोटी रुपयांच्या घरात असल्याची चर्चा सुरू आहे.या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता महसूल विभागानेही चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच आयकर विभागाची नोटीस आणि आर्थिक गुन्हे शाखेचा तपास यामुळे या प्रकरणाला अधिकच वेग आला आहे.
हिबानाम्यामुळे शासनाचा महसूल किती बुडाला, हा मुद्दा आता चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. या जमिनीची नियमित खरेदी-विक्री नोंदणीद्वारे झाली असती, तर शासनाला सुमारे 17 कोटी रुपयांची स्टॅम्प ड्युटी मिळाली असती. याशिवाय महापालिकेला संरक्षण भिंत उभारणीसाठीही काही कोटींचा निधी प्राप्त झाला असता. मात्र हिबानाम्याच्या व्यवहारामुळे शासनाचा मोठ्या प्रमाणात महसूल बुडाल्याचे स्पष्ट होत आहे.
चौकशीचे आदेश
हैदराबादमधील सालार जंग कुटुंब यांच्या वंशजांकडून छत्रपती संभाजीनगरमधील कोट्यवधींची जमीन शिवसेना खासदार संदिपान भुमरे यांच्या चालक जावेद शेख यांच्या नावावर हिबानाम्याद्वारे देण्यात आल्याचा आरोप आहे. सुमारे तीन एकर क्षेत्रफळाच्या या जमिनीची किंमत अंदाजे 150 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. या व्यवहारामुळे प्रकरण अधिकच चर्चेत आले असून, संबंधित जमिनीची चौकशी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर जावेद शेख यांना आयकर विभाग कडून नोटीस बजावण्यात आली होती. त्यानुसार 8 जुलै रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते.
या प्रकरणात गेल्या वर्षी जून महिन्यात मोठी चर्चा रंगली होती. सुमारे १५० कोटी रुपयांच्या या जमिनीचा हिबानामा चालकाच्या नावावर झाल्याची बाब समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. विरोधकांनी या प्रकरणावरून खासदार संदीपान भुमरे आणि आमदार विलास भुमरे यांच्यावरही आरोप केले होते.भुमरे यांनी या प्रकरणाशी आपला कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट करत, चालकाच्या वैयक्तिक व्यवहारांशी आपला संबंध नसल्याचे सांगितले होते. या प्रकरणाची चौकशी आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू असून, पुढील तपासात आणखी तपशील समोर येण्याची शक्यता आहे.
हिबानामा म्हणजे नेमकं काय?
हिबानामा (Hibanama) हा एक कायदेशीर दस्तऐवज आहे, ज्याद्वारे एखादी व्यक्ती आपली मालमत्ता—जमीन, घर, दागिने इत्यादी—दुसऱ्या व्यक्तीला कोणतीही आर्थिक देवाण-घेवाण न करता, पूर्णपणे निःस्वार्थपणे भेट स्वरूपात देते. “हिबा” हा अरबी शब्द असून त्याचा अर्थ “भेट” (Gift) असा होतो. ही संकल्पना विशेषतः मुस्लीम वैयक्तिक कायदा मध्ये महत्त्वाची मानली जाते, मात्र काही प्रकरणांमध्ये सर्वसामान्य व्यवहारातही तिचा वापर केला जातो.
हिबानामा करण्याचे नियम काय सांगतात?
हिबानामा वैध ठरण्यासाठी काही महत्त्वाच्या अटी पूर्ण होणे आवश्यक असते.
- स्वेच्छेने देणगी (Declaration of Gift)मालमत्ता देणाऱ्या व्यक्तीने (दाता) स्वतःच्या इच्छेने कोणताही दबाव किंवा फसवणूक नसताना भेट देण्याची स्पष्ट घोषणा करणे आवश्यक आहे.
- स्वीकृती (Acceptance):
ज्याला मालमत्ता दिली जाते (ग्रहीता), त्याने ती भेट स्वीकारणे आवश्यक आहे. ही स्वीकृती स्पष्ट असावी. - ताबा हस्तांतरण (Delivery of Possession):
मालमत्तेचा प्रत्यक्ष ताबा ग्रहीत्याकडे दिला गेला पाहिजे. ताबा न दिल्यास हिबा अपूर्ण मानला जाऊ शकतो. - इतर महत्त्वाचे मुद्दे
हिबानाम्यात कोणतीही आर्थिक देवाण-घेवाण नसते, त्यामुळे तो खरेदी-विक्री व्यवहारापेक्षा वेगळा असतो.
काही प्रकरणांमध्ये हिबानामा नोंदणीकृत (Registered) करणे आवश्यक ठरू शकते, विशेषतः स्थावर मालमत्तेसाठी.
एकदा वैधरीत्या हिबा पूर्ण झाल्यानंतर, तो परत घेणे (Revocation) सामान्यतः शक्य नसते, काही अपवाद वगळता.
हे देखील वाचा –
आयपीएल पाहण्याचा आनंद होईल दुप्पट! निम्म्या किमतीत घरी आणा 55 इंचाचा मोठा स्मार्ट टीव्ही
सरकारी पेट्रोल पंपांवर केरोसिन मिळणार ! पीएनजी उपलब्ध असेल तिथे एलपीजी मिळणार नाही
तुम्ही खात असलेले ‘हे’ 5 पदार्थ किडनीसाठी ठरू शकतात घातक; आजच आहारात करा बदल










