Home / महाराष्ट्र / School Summer Vacation: विद्यार्थ्यांची मज्जा! राज्यात 2 मेपासून उन्हाळी सुट्टीला सुरुवात; ‘या’ तारखेला वाजणार शाळेची घंटा

School Summer Vacation: विद्यार्थ्यांची मज्जा! राज्यात 2 मेपासून उन्हाळी सुट्टीला सुरुवात; ‘या’ तारखेला वाजणार शाळेची घंटा

Maharashtra school summer vacation 2026 and reopening date : राज्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. शिक्षण संचालनालयाने आगामी उन्हाळी...

By: Team Navakal
School Summer Vacation
Social + WhatsApp CTA

Maharashtra school summer vacation 2026 and reopening date : राज्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. शिक्षण संचालनालयाने आगामी उन्हाळी सुट्टी आणि नवीन शैक्षणिक वर्ष सुरू करण्याबाबत अधिकृत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

राज्य मंडळाशी संलग्न असलेल्या सर्व प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना 2 मे 2026 पासून उन्हाळी सुट्टी सुरू होणार आहे. तसेच, संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी नवीन शैक्षणिक सत्राची सुरुवात व्हावी, यादृष्टीने यंदा वेळापत्रकात काही बदल करण्यात आले आहेत.

शैक्षणिक वर्ष 2026-27 चे नियोजन:

शिक्षण संचालक शरद गोसावी आणि डॉ. महेश पालकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील सर्व विभागांमधील शाळा आता 15 जून 2026 रोजी उघडणार आहेत. विशेष म्हणजे, यंदा विदर्भातील शाळा देखील राज्याच्या इतर भागांप्रमाणेच 15 जूनलाच सुरू होतील. यापूर्वी विदर्भातील उष्णता लक्षात घेता तेथील शाळा काही दिवस उशिराने सुरू केल्या जात होत्या, मात्र आता संपूर्ण राज्यात शैक्षणिक कामकाजात सुसंगतता आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

विदर्भातील शाळांसाठी विशेष सवलत:

विदर्भातील जून महिन्यातील कडक उन्हाचा विचार करून तेथील विद्यार्थ्यांना वेळेत सवलत देण्यात आली आहे:

  • 15 जून ते 29 जून या कालावधीत विदर्भातील शाळा सकाळी 7 ते 11.45 या वेळेत भरवण्यात येतील.
  • 30 जूनपासून मात्र या शाळा नियमित वेळेनुसार सुरू होतील.
  • इतर मंडळांच्या (CBSE/ICSE) शाळांबाबत स्थानिक प्रशासनाला त्यांच्या स्तरावर निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे.

विदर्भातील शाळांच्या सुरुवातीच्या तारखेबाबत असलेली असमानता आता संपली असून, केवळ सकाळच्या सत्रात शाळा भरवण्याची मुभा देऊन प्रशासनाने विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे. या निर्णयामुळे आता राज्यभरातील शैक्षणिक वेळापत्रकात एकवाक्यता येणार आहे.

Web Title:
संबंधित बातम्या