Home / देश-विदेश / UN Diplomat Resignation: इराणवर होणार अणुहल्ला? संयुक्त राष्ट्राच्या अधिकाऱ्याचा दावा; दिला पदाचा राजीनामा

UN Diplomat Resignation: इराणवर होणार अणुहल्ला? संयुक्त राष्ट्राच्या अधिकाऱ्याचा दावा; दिला पदाचा राजीनामा

UN Diplomat Resignation: आंतरराष्ट्रीय राजकारणात एका मोठ्या बातमीने खळबळ उडवून दिली आहे. संयुक्त राष्ट्रातील (UN) वरिष्ठ राजनैतिक अधिकारी मोहम्मद सफा...

By: Team Navakal
UN Diplomat Resignation
Social + WhatsApp CTA

UN Diplomat Resignation: आंतरराष्ट्रीय राजकारणात एका मोठ्या बातमीने खळबळ उडवून दिली आहे. संयुक्त राष्ट्रातील (UN) वरिष्ठ राजनैतिक अधिकारी मोहम्मद सफा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून, जागतिक संस्थेवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. इराणमध्ये संभाव्य अण्वस्त्रांच्या वापरासाठी परिस्थिती तयार केली जात असून, संयुक्त राष्ट्र या भीषण संकटाची तयारी करत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

मोहम्मद सफा यांनी का सोडले पद?

मोहम्मद सफा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर आपला राजीनामा जाहीर केला. त्यांनी एका पत्राद्वारे या निर्णयामागची कारणे स्पष्ट केली आहेत. सफा यांच्या मते, संयुक्त राष्ट्रातील काही उच्चपदस्थ अधिकारी एका शक्तिशाली गटाच्या दबावाखाली काम करत आहेत.

“लोकांना या परिस्थितीचे गांभीर्य समजत नाहीये, कारण ही संस्था इराणवर अण्वस्त्रे डागण्याच्या तयारीला मदत करत आहे,” असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे.

तेहरानच्या फोटोंसह दिला इशारा

आपला मुद्दा मांडताना सफा यांनी तेहरान शहराचा एक फोटो शेअर केला. ते म्हणाले, “हे शहर म्हणजे एखादे ओसाड वाळवंट नाही. येथे 1 कोटी लोक राहतात. यात कुटुंबे आहेत, लहान मुले आहेत आणि स्वप्न पाहणारी सामान्य माणसे आहेत. युद्धप्रेमी लोक या शहरावर बॉम्ब टाकण्याच्या विचाराने सुखावत आहेत, पण अण्वस्त्रांचा विचार करणे ही एक मानसिक विकृती आहे.”

मानवतेच्या गुन्ह्यात सहभागी व्हायचे नाही

सफा यांनी स्पष्ट केले की, ही गोपनीय माहिती जगासमोर आणण्यासाठी त्यांनी आपल्या कूटनीतिक करिअरचा त्याग केला आहे. “मानवतेविरुद्ध होणाऱ्या या मोठ्या गुन्ह्याचा मला साक्षीदार किंवा भाग बनायचे नाही. ” असे त्यांनी पत्रात लिहिले आहे. अमेरिकेतील नागरिकही या संभाव्य धोक्याविरुद्ध रस्त्यावर उतरून निषेध करत असल्याचे त्यांनी नमूद केले.

कोण आहेत मोहम्मद सफा?

मोहम्मद सफा हे संयुक्त राष्ट्रात ‘पॅट्रियॉटिक व्हिजन’ (PVA) या आंतरराष्ट्रीय संघटनेचे मुख्य प्रतिनिधी म्हणून कार्यरत होते. या संघटनेला संयुक्त राष्ट्राच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेत विशेष सल्लागाराचा दर्जा प्राप्त आहे. सफा हे 2013 पासून या संस्थेचे कार्यकारी संचालक होते आणि 2016 पासून ते संयुक्त राष्ट्रात स्थायी प्रतिनिधी म्हणून काम पाहत होते. त्यांच्या या राजीनाम्यामुळे आता जागतिक स्तरावर संयुक्त राष्ट्राच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

Web Title:
संबंधित बातम्या