Home / महाराष्ट्र / Tara Rani : महाराणी ताराराणी या जैन समूदायाच्या, आचार्य नयन पद्मसागर बरळले; ऐतिहासिक संदर्भावरून वादाची शक्यता

Tara Rani : महाराणी ताराराणी या जैन समूदायाच्या, आचार्य नयन पद्मसागर बरळले; ऐतिहासिक संदर्भावरून वादाची शक्यता

Tara Rani : जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांनी छत्रपती ताराराणी यांच्या संदर्भात केलेल्या एका विधानामुळे सध्या सामाजिक आणि राजकीय...

By: Team Navakal
Tara Rani
Social + WhatsApp CTA

Tara Rani : जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांनी छत्रपती ताराराणी यांच्या संदर्भात केलेल्या एका विधानामुळे सध्या सामाजिक आणि राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. मुंबईत आयोजित जैन समुदायाच्या एका जाहीर कार्यक्रमात मार्गदर्शन करताना त्यांनी महाराणी ताराबाई या जैन समुदायातील होत्या, असे विधान केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे ऐतिहासिक तथ्यांवरून नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत.

आचार्य नयन पद्मसागर यांनी आपल्या संबोधनात म्हटले की, “मुघल सम्राट औरंगजेबाचा नाश करण्यासाठी आणि धर्माच्या रक्षणासाठी जैन धर्मीय असलेल्या महाराणी ताराबाईंचा जन्म झाला होता.” भारतीय इतिहासात स्वराज्य रक्षणासाठी आणि औरंगजेबाच्या आक्रमणाविरुद्ध प्रखर लढा देण्यासाठी महाराणी ताराबाईंचे योगदान अतुलनीय मानले जाते. मात्र, त्यांच्या धार्मिक ओळखीबाबत मुनींनी केलेल्या या दाव्यामुळे इतिहास संशोधक आणि शिवप्रेमींमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

महाराणी ताराबाईंच्या धार्मिक ओळखीबाबत आचार्य नयन पद्मसागर यांचे वादग्रस्त विधान; इतिहासप्रेमींमध्ये संतापाची लाट-
जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांनी छत्रपती महाराणी ताराबाई यांच्याबद्दल केलेल्या एका विधानाने नव्या वादाला तोंड फुटले आहे. मुंबईत आयोजित जैन समुदायाच्या एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी ऐतिहासिक संदर्भांचा विपर्यास केल्याचा आरोप होत आहे. “मुघल सम्राट औरंगजेबाचा प्रतिकार करण्यासाठी ज्या महाराणी ताराबाईंचा जन्म झाला, त्या जैन धर्मीय होत्या,” असे खळबळजनक वक्तव्य आचार्यांनी केले. त्यांच्या या दाव्यामुळे सामाजिक आणि राजकीय स्तरावर तीव्र पडसाद उमटण्याची चिन्हे दिसत आहेत.

आचार्य नयन पद्मसागर यांनी आपल्या भाषणात इतिहासातील विविध दाखले दिले. ते म्हणाले की, “मोहम्मद घोरीने जेव्हा भारतावर आक्रमण केले, तेव्हा मेवाडच्या एका जैन राणीने शस्त्र उपसले होते. त्यानंतर अनेक वर्षे कोणाचीही भारताकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत झाली नाही. संस्कार आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी हातात शस्त्र धरणे, हाच खरा धर्म आहे.” याच ओघात त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाचा उल्लेख केला आणि औरंगजेबाचा नाश करण्यासाठी आणखी एका ‘जैन महाराणी’चा म्हणजेच ताराराणींचा जन्म झाला, असे विधान केले.

वास्तविक, ऐतिहासिक पुराव्यांनुसार महाराणी ताराबाई या स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कन्या होत्या. छत्रपती राजाराम महाराजांच्या निधनानंतर त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सात वर्षे औरंगजेबाच्या अवाढव्य सैन्याशी लढा दिला आणि मोगली सत्तेला जेरीस आणले. पुढे त्यांनी कोल्हापूरच्या करवीर गादीची स्थापना केली.

“पंतप्रधान मोदींच्या आगमनाने भारत खऱ्या अर्थाने स्वतंत्र”; आचार्य नयन पद्मसागर यांनी व्यक्त केले उद्गार-
जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांनी एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या नेतृत्वाची मुक्तकंठाने स्तुती केली. “जो समाज आपल्या धर्माला विसरतो, त्या समाजाला उज्ज्वल भविष्य नसते,” असे प्रतिपादन करत त्यांनी मोदींच्या कार्यकाळाला भारताच्या वास्तविक स्वातंत्र्याची उपमा दिली. १९४७ मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळाले असले, तरी त्यापूर्वी केवळ गुलामीची मानसिकता बहरत होती; मात्र पंतप्रधान मोदींच्या आगमनानंतर देशाला खऱ्या अर्थाने स्वत्व आणि स्वातंत्र्य प्राप्त झाले, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

आचार्यांनी आपल्या भाषणात प्रामुख्याने अयोध्येतील राम मंदिर निर्मितीचा उल्लेख केला. त्यांच्या मते, भव्य राम मंदिराची उभारणी करून पंतप्रधान मोदींनी समस्त हिंदूंना एक अमूल्य आणि ऐतिहासिक भेट दिली आहे. पंतप्रधानांच्या कार्यक्षमतेवर भाष्य करताना ते म्हणाले की, वयाच्या ७५ व्या वर्षीही मोदीजी ज्या ऊर्जेने आणि निष्ठेने राष्ट्रसेवा करत आहेत, ते सामान्यांसाठी अत्यंत कठीण असून त्यांच्याकडून प्रेरणा घेण्यासारखी ही बाब आहे.

यावेळी आचार्यांनी भारतीय संस्कृती आणि संविधानावरही आपले विचार मांडले. ते म्हणाले की, “भारताच्या कोणत्याही गल्लीत गेले तरी संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर आणि संत नामदेव यांचे विचार ऐकू येतात. आपला पंथ कोणताही असला, तरी या भूमीत राहणारा प्रत्येक जण सांस्कृतिकदृष्ट्या हिंदू आहे.” जैन धर्मात कोणत्याही प्रकारचा जातीभेद मानला जात नाही, असे स्पष्ट करत त्यांनी संविधानाचे महत्त्व अधोरेखित केले. “अखंड भारताच्या निर्मितीसाठी संविधान हे अत्यंत महत्त्वाचे साधन असून त्यात कोणत्याही धर्माला वगळण्यात आलेले नाही,” असेही त्यांनी नमूद केले. मात्र, जो विचार किंवा धर्म हिंसा करायला शिकवतो, त्यावर कठोर बंदी घालण्याची आवश्यकता असल्याचे आग्रही प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या