India vs England T20I Series: आयर्लंडविरुद्धच्या टी२० मालिकेत झालेल्या मोठ्या उलटफेरनंतर आता भारतीय क्रिकेट संघ युनायटेड किंगडम (UK) दौऱ्याच्या दुसऱ्या आणि महत्त्वाच्या टप्प्यासाठी सज्ज झाला आहे. आयर्लंडने भारताचा 2-0 असा क्लीन स्वीप करून इतिहास रचला होता, जो कोणत्याही फॉरमॅटमधील भारताचा आयर्लंडविरुद्धचा पहिला मालिका पराभव होता. या मोठ्या धक्कादायक पराभवानंतर आता श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया इंग्लंडविरुद्ध त्यांच्याच भूमीवर ५ सामन्यांची टी२० मालिका खेळणार आहे.
या मालिकेतील पहिला सामना बुधवारी चेस्टर-ले-स्ट्रीट येथे खेळवला जाईल. भारताचा नवीन कर्णधार म्हणून नियुक्त झाल्यानंतर श्रेयस अय्यरची ही कर्णधारपदाची खरी परीक्षा असेल. आयर्लंडमधील अपयशानंतर श्रेयस अय्यर या कठीण आव्हानाला कसा सामोरा जातो आणि संघाला कशी उभारी देतो, याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.
१५ वर्षांचा वैभव सूर्यवंशी रचणार इतिहास; सचिन तेंडुलकरचा विक्रम धोक्यात!
या मालिकेतील सर्वात मोठा चर्चेचा विषय म्हणजे अवघ्या 15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचे संभाव्य पदार्पण. आयर्लंडविरुद्धच्या दोन्ही सामन्यात खेळण्याची संधी न मिळालेला बिहारचा हा तरुण खेळाडू आता इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर आहे.
आयर्लंडविरुद्ध भारताचा सलामीवीर संजू सॅमसन पूर्णपणे अपयशी ठरल्याने संघ व्यवस्थापन या सामन्यात वैभवला संधी देण्याची दाट शक्यता आहे. जर वैभव सूर्यवंशीला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले, तर तो भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा सर्वात तरुण पुरुष क्रिकेटपटू ठरेल. या प्रक्रियेत तो महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडेल, ज्याने वयाच्या 16 व्या वर्षी पाकिस्तानविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते.
भारत विरुद्ध इंग्लंड टी२० मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक (IST नुसार)
या मालिकेतील पहिला, तिसरा आणि चौथा सामना भारतीय वेळेनुसार रात्री 10:00 वाजता सुरू होईल, तर दुसरा आणि पाचवा सामना संध्याकाळी 07:00 वाजता खेळवला जाईल:
- 1st T20I: 1 जुलै (बुधवार) – रिव्हरसाईड ग्राउंड, चेस्टर-ले-स्ट्रीट (रात्री 10:00 वाजता)
- 2nd T20I: 4 जुलै (शनिवार) – ओल्ड ट्रॅफर्ड, मॅनचेस्टर (संध्याकाळी 07:00 वाजता)
- 3rd T20I: 7 जुलै (मंगळवार) – ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम (रात्री 10:00 वाजता)
- 4th T20I: 9 जुलै (गुरुवार) – काउंटी ग्राउंड, ब्रिस्टल (रात्री 10:00 वाजता)
- 5th T20I: 11 जुलै (शनिवार) – द रोज बाऊल, साऊथहॅम्प्टन (संध्याकाळी 07:00 वाजता)
दोन्ही देशांचे संपूर्ण संघ (Squads)
भारतीय संघ: श्रेयस अय्यर (कर्णधार), टिळक वर्मा (उपकर्णधार), रवी बिश्नोई, अभिषेक शर्मा, सुर्यांश शेडगे, प्रसिद्ध कृष्णा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, हर्षित राणा, इशान किशन (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंह, शिवम दुबे, प्रिन्स यादव, वैभव सूर्यवंशी.
इंग्लंड संघ: हॅरी ब्रूक (कर्णधार), रेहान अहमद, जोफ्रा आर्चर, सोनी बेकर, टॉम बँटन, जेकब बेथेल, जोस बटलर, जेम्स कोल्स, जॉर्डन कॉक्स, सॅम करन, लियाम डॉसन, विल जॅक्स, साकिब महमूद, आदिल रशीद, फिल सॉल्ट, जोश टंग, लुक वूड.
सामने टीव्ही आणि मोबाईलवर कुठे पाहायचे?
- टीव्ही प्रक्षेपण: भारत विरुद्ध इंग्लंड दरम्यानची ही टी२० मालिका भारतात ‘सोनी स्पोर्ट्स नेटवर्क’ (Sony Sports Network) च्या विविध चॅनेल्सवर थेट प्रक्षेपित केली जाईल.
- लाइव्ह स्ट्रीमिंग: जर तुम्हाला हा सामना मोबाईल किंवा लॅपटॉपवर ऑनलाईन पाहायचा असेल, तर ‘सोनी लिव्ह’ (Sony Liv) अॅप आणि संकेतस्थळावर याचे थेट प्रक्षेपण उपलब्ध असेल.
हे देखील वाचा – Lohagad Fort Murder Case: लोहगड किल्ल्यावरील ‘तो’ धोकादायक कडा अखेर बंद; केतन अग्रवाल हत्या प्रकरणात पोलिसांचे मोठे पाऊल










