Triumph 350cc Range: ब्रिटीश मोटरसायकल निर्माता कंपनी ट्रायम्फने भारतीय बाजारपेठेत आपली सर्वात परवडणारी ३५० सीसी बाईक रेंज अधिकृतपणे विक्रीसाठी उपलब्ध करून दिली आहे. मिड-साईज सेगमेंटमध्ये येणाऱ्या या बाईक्सच्या इंजिन क्षमतेत बदल केल्यामुळे आता या गाड्या पूर्वीपेक्षा स्वस्त झाल्या आहेत. जीएसटी नियमांमधील बदलाचा फायदा थेट ग्राहकांना मिळावा, या उद्देशाने कंपनीने हे पाऊल उचलले आहे.
गाड्यांचे खास फीचर्स (Features):
- इंजिन: या रेंजमध्ये आता ३५० सीसीचे इंजिन देण्यात आले असून, ते पूर्वीच्या ४०० सीसी इंजिनवर आधारित आहे.
- पॉवर: Speed 400 आणि Scrambler 400X मधील इंजिन आता ३६.५० बीएचपी पॉवर आणि ३२ एनएम टॉर्क जनरेट करते.
- स्पीड: Speed 400 आता ० ते १०० किमी प्रति तास हा वेग साधारण ८.१ सेकंदात गाठू शकते.
- डिझाइन: इंजिनमध्ये बदल झाले असले तरी गाडीचा मूळ लूक, फ्रेम, सस्पेंशन आणि ब्रेक्समध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
- नवीन मॉडेल: कंपनीने भारतात Tracker 400 हे नवीन मॉडेलही सादर केले असून, ते ४० एचपी पॉवर आणि ३२ एनएम टॉर्कसह येते.
- टॅक्स बेनिफिट: ३५० सीसी पेक्षा कमी इंजिन असल्यामुळे या गाड्या आता १८% जीएसटी स्लॅबमध्ये येतात, ज्यामुळे किमती कमी झाल्या आहेत.
नवीन किमती (एक्स-शोरूम):
- Speed T4: १,९५,००० रुपये
- Speed 400: २,३१,८९० रुपये
- Scrambler 400: २,५९,२४१ रुपये
- Thruxton 400: २,६५,५३८ रुपये
- Scrambler 400 XC: २,८९,५३४ रुपये











